राष्ट्र्रवादी काँग्रेस पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पहाटेच्या शपथविधीला तीन वर्षांपेक्षा जास्त काळ उलटला असला तरी त्यावर अजूनही राजकीय वर्तुळात चर्चा रंगत आहे. नुकतेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांनी डबल गेम केला असे म्हटले होते. त्यावर आता एका मुलाखतीदरम्यान खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Latest Marathi News)
त्वरा करा! वनप्लसच्या ‘या’ 5G फोनवर होईल 24 हजारांपेक्षा जास्त बचत, असा करा ऑर्डर
२०१९ च्या शपथविधीबद्दल तुम्हाला माहिती होते का? यांचे उत्तर देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “२०१९ चा शपथविधी? नाही त्यावेळी मला काहीही माहित नव्हतं. मी कशातच नव्हते. इतके डिटेल्स मला माहित नव्हते. पहाटेच्या शपथविधीची बातमी मला सदानंद सुळे (Sadananda Sule) यांनी दिली होती. कारण मी त्यावेळी झोपले होते.” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
“कारण मी त्यावेळी दादाशी नेता आणि भाऊ म्हणून संपर्कात होते. आमच्या फॅमिलीत सगळेच एकमेकांच्या संपर्कात असतात. तेव्हा दादाच्या मनात काय घालमेल झाली माहित नाही. कारण मी कधी या विषयावर त्यांच्याशी बोलले नाही.” असेही सुप्रिया सुळे यांनी सांगितले आहे.
5 स्टार हॉटेलसमोर विद्या बालनने मागितले होते भीक, स्वतः च सांगितला ‘तो’ भयानक किस्सा
हे ही पहा