Sanjay Raut । “2024 पूर्वीच भाजपमध्ये पडणार फूट”, संजय राऊत यांचा मोठा दावा

"There will be a split in BJP before 2024", Sanjay Raut's big claim

Sanjay Raut । मुंबई : सध्या राज्यात शिंदे-फडणवीस-पवार यांचे सरकार आहे. या महायुतीचा फायदा सरकारला आगामी निवडणुकांमध्ये (Loksabha Election) होईल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या महायुतीविरुद्ध लढण्यासाठी विरोधकही तितक्याच जोमाने तयारी करत आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये कडवी टक्कर पाहायला मिळेल. खासदार संजय राऊत यांनी भाजपविरुद्ध (BJP) एक दावा केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

Shailesh Lodha । शैलेश लोढांचा निर्मात्यांबाबत खळबळजनक दावा; म्हणाले, “कलाकारांना नोकरांसारखी…”

“2024 पूर्वीच भाजपमध्ये फूट पडेल. भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए (NDA) ही एक नौटंकी असून शिवसेना आणि अकाली दल नसेल तर एनडीए शून्य आहे. एनडीए अस्तित्वातच नाही. ती राहील की नाही याबद्दल काही सांगता येत नाही. जर भाजपमध्ये नितिमत्ता असेल तरच ते त्या 16 आमदारांच्या (Shivsena MLA) अपात्रतेवर निर्णय घेऊ शकतील. भाजपने सनातन धर्माच्या रक्षणाचा ठेका घेतला नाही,” असेही राऊत यांनी स्पष्ट केले.

NCP । शरद पवार गटाला मोठा दणका! केंद्रीय पातळीवर अजित पवार गटाची वाढली ताकद

“आम्ही जेव्हा इंडिया म्हणून एकत्र आलो तेव्हा एनडीएला जाग आली. नाहीतर तोपर्यंत अकेला मोदी काफी है हेच चालू होतं. आताची एनडीए ही खूप कमजोर आहे. कारण बाकीचे लोक येत जात आहेत. अजून काही जण भाजप पक्षामधून बाहेर पडतील. 2024च्या आधीच भाजपात महाभूकंप होणार,” असा खळबळजनक दावा संजय यांनी केला आहे.

Kerala Accident । भीषण अपघात! स्कूल बसची रिक्षाला धडक, चार महिलांसह ५ जणांचा मृत्यू

Spread the love