Kerala Accident । भीषण अपघात! स्कूल बसची रिक्षाला धडक, चार महिलांसह ५ जणांचा मृत्यू

School bus collides with rickshaw, 5 people including 4 women die

Kerala Accident । अनेक अपघात (Accident) हे वाहनचालकांच्या चुकीमुळे होतात. परंतु, या अपघातांमुळे (Accident News) अनेकांचे संसार उध्वस्त होतात. या अपघातात कोणाला आपला जीव गमवावा लागतो तर कोणाला कायमचे अपंगत्व येते. वाहतुकीचे नियम (Traffic rules) कडक केले तरीही अपघाताचे प्रमाण कमी झाले नाही. अशीच एक अपघाताची घटना समोर आली आहे. यात चार महिलांसह ५ जणांचा मृत्यू झाला आहे. (Latest Marathi News)

BJP । निवडणुकांपूर्वीच भाजपला मोठा धक्का! सर्वात मोठा पक्ष एनडीएतून बाहेर

मिळालेल्या माहितीनुसार, केरळच्या कासरगोड जिल्ह्यात ही घटना घडली आहे. हा अपघात काल रात्री स्कूल बस आणि ऑटोरिक्षा (School bus and Autorickshaws Accident) यांच्यात झाला. ही धडक इतकी जोरदार होती की यामध्ये चार महिलांचा जागीच मृत्यू झाला तर एकाचा दवाखान्यात नेत असताना मृत्यू झाला. ही बस शाळकरी मुलांना त्यांच्या घरी सोडून परत येत होती, सुदैवाने त्यात मुले नव्हती.

IND vs AUS । केएल राहुलला वाटते या गोलंदाजाची सर्वात जास्त भीती, म्हणाला; “या गोलंदाजाला खेळणं ..”

या बसचा वेग जास्त होता आणि ती चुकीच्या दिशेने येत होती त्यामुळे हा अपघात झाला, अशी माहिती प्राथमिक तपासात समोर आली आहे. यात स्कूल बस आणि रिक्षाचे खूप नुकसान झाले आहे. धक्कादायक बाब म्हणजे एकाच कुटुंबातील या चारही महिला होत्या. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. बस चालक पोलिसांच्या ताब्यात आहे.

Accident News । बसचा अतिशय भीषण अपघात! चालकाचे नियंत्रण सुटून बस थेट पुलात कोसळली; २५ प्रवाशी जखमी

Spread the love