Gadar 2 । बॉक्स ऑफिसवर ‘गदर २’ ची जादू, पहिल्याच दिवशी जमवला ‘इतका’ गल्ला

The magic of 'Gadar 2' at the box office, gathered 'itka' on the first day

Gadar 2 । बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सनी देओल (Sunny Deol) आणि प्रसिद्ध अभिनेत्री अमिषा पटेल (Amisha Patel) हे दोघे ‘गदर २’ या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र आले आहेत. काल बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित असणारा चित्रपट ‘गदर २’ प्रदर्शित झाला. या चित्रपटाचा ट्रेलर (Gadar 2 Trailer)लाँच झाल्यापासून त्याची तुफान चर्चा सुरु होती. महत्त्वाचे म्हणजे प्रेक्षकांनी या चित्रपटाचे तिकीट अगोदरच बुक केले होते. (Latest Marathi News)

राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय! आता लॉटरी पद्धतीने नाही तर सर्व अर्जदारांना मिळणार शेततळे

पहिल्याच दिवशी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खूप कमाई केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार चित्रपटाने पहिल्या दिवशी ४० ते ४५ कोटी रुपयांचा गल्ला (Gadar 2 Collection) जमवला आहे. ‘गदर: एक प्रेम कथा’ चित्रपटाचा हा सिक्वेल आहे. विशेष म्हणजे ॲडव्हान्स बुकिंगमध्ये २० लाख तिकिटे विकल्याचा नवा विक्रम या चित्रपटाने बनवला आहे. अभिनेता शाहरुख खानच्या पठाणनंतर हा वर्षातील सर्वात मोठा ब्लॉकबस्टर चित्रपट ठरू शकतो.

Asian Champions Trophy Semi Final । भारतीय संघ-जपानमध्ये होणार कडवी टक्कर, फायनलमध्ये कोणता संघ मारणार बाजी? जाणून घ्या

आता हा चित्रपट प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांच्या सोशल मीडियावर प्रतिक्रिया पाहायला मिळत आहे. अनेकांना हा चित्रपट खूप आवडला आहे तर काहींनी यावर टीकेची झोड उठवली आहे. प्रेक्षकांच्या मिश्र प्रतिक्रियेनंतर आता हा चित्रपट येत्या काळात किती रुपयांचा गल्ला जमवतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Business Idea । शेतकऱ्यांनो बक्कळ कमाई करायची असेल तर सुरु करा ‘हा’ सुपरहिट व्यवसाय! सरकारही करेल मदत

या चित्रपटामध्ये सनी देओल आणि अमीषा पटेल, उत्कर्ष शर्मा, लव्ह सिन्हा, गौरव चोप्रा,सिम्रत कौर, मिर सरवार हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहे. रोहित चौधरी आणि मनीष वाधवा यांनी या चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारलेली आहे.

Bigg Boss OTT 2 विजेत्याला मिळणार तब्बल ‘इतके’ लाख रुपये बक्षीस; वाचून बसेल धक्का

Spread the love