
Crime News । नवी दिल्ली : प्रेमापोटी (Love) कधी कोण कोणत्या टोकाला जाईल हे सांगताही येत नाही. अलीकडच्या काळात प्रेमविवाह (Love marriage) करणाऱ्यांच्या संख्येत झपाटयाने वाढ झाली आहे. काही कुटुंबीय प्रेमविवाहला परवानगी देतात मात्र काहीजण त्याला कडाडून विरोध करतात. यातून गुन्हेदेखील (Crime) घडत आहेत. प्रेम कधी कोणावर होईल हे सांगता येत नाही. प्रेमाला वय नसते. तसेच प्रेमाला बंधनही नसते. (Latest Marathi News)
असेच काहीसे प्रकरण उत्तराखंड राज्यातील देहरादून राजधानीत घडले आहे. एक लेफ्टनंट कर्नल डान्सबारमध्ये काम करणाऱ्या महिलेच्या प्रेमात पडला होता. तो त्या महिलेला सिलिगुडीला एका बारमध्ये भेटला होता. त्यांच्यात तीन वर्षे प्रेमसंबंध होते. त्यानंतर त्या लेफ्टनंट कर्नलची बदली देहरादूनला झाली. तो त्या महिलेला देहरादूनला घेऊन आला. तिच्यासाठी त्याने एक घरदेखील खरेदी केले होते. (Crime News)
परंतु ती सतत आपल्याला पत्नीचा दर्जा द्यावा, अशी मागणी करत होती. त्याला लेफ्टनंट कर्नल विरोध करत होता. रमेंदु उपाध्याय असे या लेफ्टनंट कर्नलचे नाव आहे. त्याने त्या महिलेला दारू पाजली आणि हातोड्याने तिच्या डोक्यात खूप वार केले. वार अधिक असल्याने त्या महिलेचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांना त्या महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला आहे.
Manoj Jarange Patil । गावकऱ्यांच्या आग्रहाखातर जरांगे पाटलांनी घेतली सलाईन, आज घेणार मोठा निर्णय
पोलिसांनी लेफ्टनंट कर्नलला राहत्या घरातून अटक केली आहे. या संपूर्ण घटनेमुळे सर्वांना एकच धक्का बसला आहे. दरम्यान, पोलिसांकडून या प्रकरणाची खोलवर चौकशी करण्यासाठी एक पथक तयार करण्यात देखील आले आहे.