Pusesawali Riots | साताऱ्यातील दंगलीत एकाचा मृत्यू तर 10 जण जखमी, 200 जणांवर गुन्हा दाखल; नेमकं काय आहे प्रकरण? जाणून घ्या..

Pusesawali Riots

Pusesawali Riots | सध्याअनेक जण सोशल मीडियाचा वापर करतात. काहीजण चांगल्या गोष्टींसाठी सोशल मीडिया वापरतात तर काहीजण वाईट गोष्टींसाठी देखील सोशल मीडियाचा वापर करत असतात. सोशल मीडियावर महापुरुषांचा अपमान केल्यामुळे तसेच वादग्रस्त पोस्ट टाकल्यामुळे मागच्या काही दिवसांपासून अनेक ठिकाणी वाद होत असल्याचे आपण पाहत आहोत. दरम्यान काल देखील साताऱ्यामध्ये सोशल मीडियावर महापुरुषांच्या वादग्रस्त पोस्टमुळे दंगल भडकली. संतप्त जमावाने येथील प्रार्थना स्थळावर हल्ला केला. यामध्ये 11 जणांना मारहाण देखील करण्यात आली आहे. यामध्ये एकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. (Satara Nnews)

Maratha Reservation | आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी! आरक्षण देण्यास सरकार तयार पण…

या हल्ल्यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून दहा जण जखमी झाले आहेत. सध्या जखमींवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. त्यातील एका जखमीच्या फिर्यादीवरून पोलिसात जवळपास 200 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जोपर्यंत दंगलीमध्ये सहभागी असणाऱ्या सर्व संशयीतांना अटक होत नाही तोपर्यंत यामध्ये मृत्यू झालेल्या व्यक्तीला दफन न करण्याचा पवित्रा त्या ठिकाणी जमलेल्यांनी घेतला होता. त्यामुळे मोठा तणाव निर्माण झाला होता.

Riots in Satara । धक्कादायक! वादग्रस्त पोस्टच्या वादातून दंगल, एकाचा मृत्यू तर एकजण गंभीर जखमी

काल रात्री जी दंगल झाली त्या दंगलीमध्ये सहा दुचाकी, एक चार चाकी त्याचबरोबर अनेक घरे, दुकानांची तोडफोड जमावाकडून करण्यात आली आहे. दुचाकी चारचाकी जाळण्याचा प्रयत्न देखील जमावाकडून झाला आहे. यामुळे सातारा जिल्ह्यातील इंटरनेट सेवा काल मध्यरात्रीपासून बंद ठेवण्यात आली आहे. पुसेसावळीसह परिसरात जमावबंदीचे देखील आदेश लागू करण्यात आले आहेत. पुन्हा या ठिकाणी काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी राज्य राखीव पोलीस दलासह जिल्ह्यातील पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आला आहे.

Manoj Jarange । अजित पवार यांना मनोज जरांगेंचं आवाहन; म्हणाले ‘पवारांनी चार-पाच…’

Spread the love