वरात दारात येऊन थांबली अन् अचानक नवरी मुलीने दिला लग्नाला नकार; कारण वाचून हादराल

Marriage

सध्या लग्नसराईचा हंगाम सुरु असल्याने त्याचीच चर्चा सुरु आहे. तुम्ही अनेकदा लग्नसमारंभाबत चांगल्या, वाईट किंवा चकित करणाऱ्या बातम्या ऐकल्या असतील. याबाबत सोशल मीडियावरही (Social media) अनेक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत नेटकरीही त्याला चांगला प्रतिसाद देतात. दरम्यान अशाच एका लग्नाची चर्चा सुरु आहे. नवरदेव लग्नाच्या मिरवणुकीत दारू पिऊन आल्याने नववधुने लग्नाला नकार दिल्याची घटना घडली आहे. नववधूची समजूत काढूनही त्यावर कोणता उपाय निघाला नाही त्यामुळे नवरदेवाला रिकाम्या हाताने माघारी फिरावे लागले आहे. (Latest Marathi News)

मोठा अपघात! पंढरपूरला निघालेल्या वारकऱ्यांच्या पालखीत वाहन घुसलं, अपघातात वारकरी गंभीर जखमी

उत्तर प्रदेशातील (UP) हरदोई जिल्ह्यातील मल्लवान कोतवाली भागात ही घटना घडली आहे. याच भागातील माजरा अंतिया, राघोपूर गावातील राम लदैती हिचा विवाह औरैया जिल्ह्यातील बडवा पोस्ट भाग्य नगर गावातील ओमप्रकाश याच्याशी निश्चित करण्यात आला होता. शुक्रवारी रात्री मिरवणूक आली खरी पण नवरदेव हा दारूच्या नशेत होता. भावी नवरदेवाची ही अवस्था पाहता नववधूच्या बाजूच्या मंडळींनी नवरदेवाच्या वडिलांचा शोध घेतला. परंतु त्याचे वडील मिरवणुकीला आलेच नाही असे समजले. त्यानंतर जास्त गोंधळ झाला. काही ज्येष्ठांनी मंडळींनी परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न केला.

एक लिटर दुधाला देशी दारूच्या क्वॉर्टर एवढी किंमत द्या; ‘या’ बड्या नेत्याची मागणी

त्यानंतर मिरवणूक निघाली खरी पण वराला उशीर झाला. ही बाब नववधूला समजली. रागाने भडकलेल्या नववधूने थेट लग्नालाच नकार दिला. तिची समजूत काढली परंतु तिने एकवेळ कुमारी राहीन, पण दारुड्याशी लग्न करणार नाही, असे ठणकावून सांगितले. यावर पंचायत बसली पण काही फायदा झाला नाही. त्यामुळे वराच्या पक्षाला रिकाम्या हाताने परतावे लागले.

सिंहगडावर असे काय घडले की सगळेजण जीवाच्या आकांताने पळू लागले

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *