Fire News । झोपडीला लागली आग, मुलींचा मोठा आक्रोश; अन् काही क्षणातच आगीत ४ बहिणी जिवंत जळाल्या

Fire News

Fire News । सध्या एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका झोपडीला भीषण आग लागल्याने तीन निष्पाप मुलींचा जागीच मृत्यू झाला आहे. यामुळे सगळीकडे मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. या आगीमध्ये एक मुलगी गंभीर भाजली त्यांनतर तिला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले मात्र त्या मुलीचा देखील रुग्णालयामध्ये मृत्यू झाला आहे. या चार मृत मुली चुलत बहिणी असल्याची माहिती मिळत आहे.

Manoj Jarange Patil । उद्या आंदोलन कसं असणार? मनोज जरांगे यांनी केली याबाबत सर्वात मोठी घोषणा

आगीमध्ये एक महिला देखील भाजली असून सध्या महिलेला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. सध्या या महिलेवर रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत. माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यात ही घटना घडली आहे. फरीदपूर पोलीस स्टेशन हद्दीतील नवादा बिलसांडी गावात घटना घडल्याची माहिती मिळत आहे. यामुळे तेथील परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.

Ajit Pawar । भर सभेत अजित पवार अधिकाऱ्यांवर भडकले; म्हणाले, ‘मस्ती आली आहे का?’

या घटनेचे माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला. झोपडीला आग लागली त्यावेळी त्याच झोपडीजवळ काही मुली खेळत होत्या. निष्पाप मुलीही आगीच्या भक्ष्यस्थानी आल्या. निष्पाप मुली आगीच्या भक्ष्यस्थानी अडकल्या. मुलींचा आरडाओरडा ऐकून घरातील सदस्य आणि शेजारी घटनास्थळी धावले. त्यांनी बादल्यांमध्ये पाणी भरून आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत चारही चुलतबहिणी जळून खाक झाल्या होत्या.

Ashok Chavan । अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशावर फडणवीसांनी केले मोठे वक्तव्य; म्हणाले, “राजकारणात काम करताना…”

Spread the love