Hardik Pandya Video । मोठी बातमी! हार्दिक पांड्याचा ‘तो’ व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल; पाहा व्हिडीओ

Hardik Pandya

Hardik Pandya Video । भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू आणि आयपीएल फ्रँचायझी मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या सध्या चर्चेत आहे. गेल्या एक महिन्यापासून त्याच्या प्रशिक्षणाचे व्हिडिओ सातत्याने समोर येत होते. शुक्रवारी, एकदिवसीय विश्वचषक 2023 पासून क्रिकेटपासून दूर असलेल्या पांड्याचा आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला. त्याचा हा व्हिडिओ शूटिंगदरम्यान काढण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. या व्हिडीओमध्ये हार्दिक सपोर्ट स्टाफवर चिडताना दिसत आहे.

Fire News । झोपडीला लागली आग, मुलींचा मोठा आक्रोश; अन् काही क्षणातच आगीत ४ बहिणी जिवंत जळाल्या

अनेक लोक हा व्हिडिओ इंस्टाग्राम आणि एक्सवर शेअर करत आहेत. हार्दिक पांड्याच्या काही शूटिंगदरम्यान हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये हार्दिकला शूटिंगपूर्वी दिल्या जाणाऱ्या जेवणावर राग काढताना हार्दिक पांड्या दिसत आहे.

Ashok Chavan । अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशावर फडणवीसांनी केले मोठे वक्तव्य; म्हणाले, “राजकारणात काम करताना…”

तो म्हणतो, ‘जिलेबी आणि कोणता ढोकळा?’ मला फिटनेस करायचा आहे. काय आणलंय? माझे शेफ आणि न्यूट्रिशनिस्ट कुठे आहेत?’ यात स्टाफ मेंबर म्हणतो, ‘सर, कृपया ॲडजस्ट करा’, तर हार्दिक म्हणतो, ‘मी काय ॲडजस्ट करू, त्यामुळे माझा स्टॅमिना खराब होईल. असं म्हणत असल्याचे दिसत आहे.

Manoj Jarange Patil । उद्या आंदोलन कसं असणार? मनोज जरांगे यांनी केली याबाबत सर्वात मोठी घोषणा

हा व्हिडीओ कधी आणि कुठचा आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा होत आहे. यावर लोक मजेशीर कमेंटही करत आहेत.

Spread the love