पती-पत्नीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना! पत्नीच्या जेवणात ड्रग्स मिसळून दुसऱ्या पुरुषांना…

The event that darkens the relationship of husband and wife! Other men mixed drugs in wife's food...

सातही जन्म हाच पती मिळावा किंवा सातही जन्म हीच पत्नी मिळावी अशी अनेकांची इच्छा असते. कारण इतर नात्यांपेक्षा पती-पत्नीचं एक वेगळंच नातं असते. परंतु पती-पत्नीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना फ्रान्समध्ये (France) घडली असून पोलिसांनी आरोपी पतीच्या मुसक्या आवळल्या आहेत. तसेच पोलिसांनी याप्रकरणी 51 पुरुषांना अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. (France News)

महिलेने सिंहाला कवळीत पकडलं अन् पळत सुटली; पाहा थरकाप उडवणारा व्हिडीओ

पोलिसांनी दिलेल्या माहितींनुसार, ही घटना फ्रान्समधील आहे. डॉमिनीक असे या आरोपी पतीचे नाव आहे. तो आपल्या पत्नीच्या जेवणात दररोज रात्री ड्रग्स मिसळून दुसऱ्या पुरुषांना तिच्यावर अत्याचार करायला सांगत होता. याहून सर्वात धक्कादायक बाब म्हणजे याची कसलीच माहिती पीडितेला माहिती नाही. 2011 ते 2020 हा किळसवाणा प्रकार सुरु होता. आरोपींमध्ये एक फायरमॅन, बँक कर्मचारी, एक लॉरी ड्रायव्हर तसेच जेल गार्ड, एक नर्स आणि पत्रकार यांचाही समावेश असून इतर आरोपींचा शोध सुरु आहे.

प्रवाशांनी गच्च भरलेल्या बसचा टायर फुटला अन् झाला भीषण अपघात; १२ जण जखमी

हे प्रकरण इथवरच थांबले नाही. आरोपी या कृत्याचे रेकॉर्डिंग करत होता. तसेच त्याची कुठे वाच्यता होऊ नये म्हणून तो इतर आरोपींना अंघोळ करायला लावत होता. आरोपी आणि पीडित महिलेच्या लग्नाला 50 पेक्षा जास्त वर्ष झाली आहेत आणि त्यांना तीन मुले आहेत. दरम्यान हे सर्व प्रकरण चेंजिंग रूममध्ये महिलांचे रेकॉर्डिंग करण्यासाठी छुपे कॅमेरे वापरण्याच्या आरोपाखाली प्राथमिक तपास करत असताना पोलिसांनी हा धक्कादायक प्रकार उघडकीस आणला आहे.

Gautam Adani । अदानी साम्राज्याला पुन्हा धक्का! चौकशी सुरु होताच ५२ हजार कोटी गेले पाण्यात

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *