अनेक दिवसापासून दडी मारून बसलेल्या पावसाला अखेर सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातील (Maharashtra Rain) अनेक भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे अनेक दिवसांच्या पावसाच्या प्रतीक्षेत असणारा बळीराजा सुखावला आहे. अशातच हवामान खात्याने (IMD) काही जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. (Latest Marathi News)
मुंबई (Mumbai), पुणे (Pune), नागपूर (Nagpur), नाशिकसह महाराष्ट्रातील अनेक भागात पावसाने थैमान घातले असून आणखी 5 दिवस या भागात पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान खात्याकडुन रत्नागिरी आणि रायगडमध्ये ऑरेंज अलर्ट (Orange Alert) जारी करण्यात आला आहे. तसेच राज्यातील अनेक भागात यलो अलर्ट जारी केला आहे.
पुढील काही दिवस कोकण आणि विदर्भात अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. परंतु, राज्यातील अनेक भागात अजूनही पाऊस पडला नसल्याने चिंता व्यक्त केली जात आहे अशातच हवामान खात्याकडून या जिल्ह्यांमध्ये येत्या 48 तासात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली.
संदीप मारुती चांदगुडे यांच्या प्रयत्नातून म्हसोबाची वाडी जिल्हा परिषद शाळेमध्ये कम्प्युटर मिळाले