मागच्या काही दिवसापासून राज्याच्या राजकारणामध्ये अनेक मोठं मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहे. अनेक नेते तसेच कार्यकर्ते पक्षांतर करताना दिसत आहेत. दरम्यान सध्या सोलापूर (Solapur) जिल्ह्यात भाजपला मोठा धक्का बसला आहे. दक्षिण सोलापूर (South Solapur) तालुक्यातील भाजपच्या शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केल्याची माहिती समोर आली आहे.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील ग्रामपंचायत सदस्यांसह शेकडो कार्यकर्त्यांनी ठाकरे गटामध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे भाजपला मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे. प्रवेशाच्या वेळी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
सर्वात मोठी बातमी! संपुर्ण राज्यात पुढील ५ दिवस तुफान पाऊस बरसणार; ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट
या पक्षप्रवेशामुळे दक्षिण सोलापूर तालुक्यात आगामी निवडणुकांच्या पार्शवभूमीवर भाजपला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटातील या पक्ष प्रवेशाला महत्त्व प्राप्त झाले आहे.