राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांना सोशल मीडियाच्या (Social media) माध्यमातून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणी पोलीस चौकशी करत होते. या प्रकरणी ध पुणे शहरातून सागर बर्वे याला अटक करण्यात आली. त्याचबरोअबर, या प्रकरणी सौरभ पिंपळकर यांचे नाव देखील समोर येत होते.
Urfi Javed । मोठी बातमी! उर्फी जावेद रस्त्यावर पडली अन् घडले धक्कादायक; व्हिडिओही झाला व्हायरल
सतत नाव समोर आल्यानंतर सौरभ पिंपळकर माध्यमांसमोर आले असून या प्रकरणी त्यांनी आपली भूमिका मांडली आहे. याबाबत बोलताना ते म्हणाले, शरद पवार यांना धमकी देणाऱ्या प्रकरणामध्ये माझा काहीही संबंध नाही. त्या सोशल मीडिया पोस्टचा आणि माझा देखील काहीच संबंध नाही असं ते म्हणाले आहेत.
दुसऱ्या महिलेसोबत पती करत होता रोमान्स, पुढे जे घडले ते…
त्याचबरोबर पुढे ते म्हणाले, सुप्रिया सुळे यांनी ते ट्विट माझ्या नावाने दाखवलं. आणि माझ्यावर आरोप केले. त्यामुळे मी सुप्रिया सुळे, अमोल मिटकरी, रोहित पवार, आणि जितेंद्र आव्हाड यांच्याविरुद्ध मानहानीचा दावा दाखल करणार असल्याचे सौरभ यांनी म्हंटल आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.