आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी! दर्शना पवार खून प्रकरणातील मुख्य आरोपी राहुल हांडोरेला अटक

The biggest news of the moment! Rahul Handore, the main accused in the Darshana Pawar murder case, was arrested

Rahul Handore arrested in Darshana Pawar murder case | राजगडाच्या पायथ्याशी MPSC च्या परीक्षेत राज्यात तिसऱ्या आलेल्या दर्शना पवारचा (Darshana Pawar) मृतदेह अर्धवट कुजलेल्या स्थितीत 18 जून रोजी आढळून आला होता. पुढे तपासात तिची हत्या झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यावरून एकच खळबळ उडाली आहे. या घटनेने संपूर्ण राज्याला हादरून टाकले आहे. आता याप्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे.

राष्ट्रवादीला मोठा धक्का! राष्ट्रवादीची साथ सोडत तमाशा कलावंत सुरेखा पुणेकर यांनी केला बीआरएस पक्षात प्रवेश

या प्रकरणातील आरोपी राहुल हंडोरेला अटक करण्यात आली आहे. मुंबई येथून हंडोरेला अटक करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, पुणे ग्रामीण पोलिसांनी आरोपी राहुलला अटक केली आहे. राहुलसोबत लग्न करण्यास दर्शनाने नकार दिला त्यामुळे संतापलेल्या राहुल हंडोरे याने दर्शना पवारची हत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

बसमध्ये सीटवर एकीने ओढणी टाकली अन् दुसरी येऊन बसली; त्यानंतर दोघींची भांडणे जुंपली आणि झाली तुफान हाणामारी; पाहा VIDEO

या प्रकरणामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. आता या हत्याकांड प्रकरणात आज दुपारी पत्रकार परिषद घेऊन पोलीस अधिकची माहिती देणार आहेत. या प्रकारामुळे अनेकजणांनी आक्रमक भूमिका देखील घेतल्या आहेत.

नवरदेवाने हुंड्यात बाईक मागितली, मुलीचे वडील संतापले, भर लग्नमंडपात वराला केली चप्पलने मारहाण; व्हिडिओ व्हायरल

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *