Ajit Pawar | मागील काही दिवसापासून राज्यात नाट्यमय घडामोडी घडत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची घोषणा एका कार्यक्रमामध्ये केली होती. त्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांच्या हट्टामुळे त्यांनी राजीनामा मागे घेतला. परंतु दिल्लीतील एका कार्यक्रमामध्ये खासदार सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांना पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी दिली होती. त्याशिवाय त्यांनी इतर कार्यकर्त्यांकडेही जबाबदाऱ्या दिल्या होत्या.
आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी! दर्शना पवार खून प्रकरणातील मुख्य आरोपी राहुल हांडोरेला अटक
परंतु त्यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडे कोणतीच जबाबदारी दिली नव्हती. त्यामुळे ते नाराज असल्याच्या चर्चांना उधाण राजकीय वर्तुळात आले होते. यावर आता अजित पवार यांनी आपल्याला विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी नको, तर पक्षाच्या संघटनात्मक बांधणी विषयी जबाबदारी देण्याची मागणी एका कार्यक्रमात केली आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्याचबरोबर आता सुप्रिया सुळे यांनी देखील यावर प्रतिक्रिया आहे.
यावर प्रतिक्रिया देत सुप्रिया सुळे म्हणाल्या, “अजितदादांची इच्छा पूर्ण व्हावी, हीच माझी देखील इच्छा आहे. मला मनापासून आनंद आहे की अजित दादांला देखील संघटनेत काम करायची इच्छा आहे. यामुळे आता दादाला प्रदेशाध्यक्षपद द्यायचं की नाही हा संघटनात्मक पातळीवरचा निर्णय आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. सध्या त्यांच्या वक्तव्याची सगळीकडे जोरदार चर्चा सुरु आहे.
दर्शना पवार हत्याकांडप्रकरणी मराठा समाज आक्रमक; अहमनगरमध्ये मोठा मोर्चा