Ajit Pawar | मागील काही दिवसापासून राज्यात नाट्यमय घडामोडी घडत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची घोषणा एका कार्यक्रमामध्ये केली होती. त्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांच्या हट्टामुळे त्यांनी राजीनामा मागे घेतला. परंतु दिल्लीतील एका कार्यक्रमामध्ये खासदार सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांना पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी दिली होती. त्याशिवाय त्यांनी इतर कार्यकर्त्यांकडेही जबाबदाऱ्या दिल्या होत्या.
Ashadhi Wari 2023 । आषाढी वारकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांनी घेतला धडाकेबाज निर्णय!
परंतु त्यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडे कोणतीच जबाबदारी दिली नव्हती. त्यामुळे ते नाराज असल्याच्या चर्चांना उधाण राजकीय वर्तुळात आले होते. यावर आता अजित पवार यांनी आपल्याला विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी नको, तर पक्षाच्या संघटनात्मक बांधणी विषयी जबाबदारी देण्याची मागणी एका कार्यक्रमात केली आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
Amruta Fadnavis । अमृता फडणवीस ‘त्या’ फोटोंमुळे चर्चेत, नेटकऱ्यांनीही केलं ट्रोल; पाहा PHOTO
एका कार्यक्रमादरम्यान बोलत असताना पवार यांनी “मला विरोधी पक्षनेत्यात काही रस नव्हता. परंतु मी नेतेमंडळींच्या आग्रहाखातर या पदाची जबाबदारी घेतली असून एक वर्ष या पदाची जबाबदारी सांभाळली आहे. परंतु आता बस झालं. मला या जबाबदारीतून मोकळ करा. मला आता संघटनेची जबाबदारी द्या.”, असे अजित पवार म्हणाले आहेत. त्यावर आता पक्ष कोणती भूमिका घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
हे ही पाहा