सध्या एक अतिशय महत्वाची बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदी सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची निवड करण्यात आली आहे. शरद पवार यांनी ही घोषणा केली आहे. आज पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात बोलताना मोठी घोषणा केली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात आता चर्चानं उधाण आले आहे.
Accident | समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघात; तीन जणांचा मृत्यू
शरद पवार यांनी मोठी घोषणा केली असून आता इथून पुढे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यापुढे काम पाहणार आहेत. या सर्वांमध्ये अजित पवार यांच्याकडे कोणतीच जबाबदारी देण्यात आलेली नाही. त्यामुळे राष्ट्रवादीत अजित पवार साईड ट्रॅकवर गेले काय? अशा चर्चा रंगल्या आहेत.
देवेंद्र फडणवीस आणि माझा घटस्फोट होऊ शकतो? असं का बोलल्या अमृता फडणवीस?
माहितीनुसार, प्रफुल्ल पटेल यांच्याकडे मध्यप्रदेश, गुजरात, राजस्थान, झारखंड या राज्याची जबाबदारी देण्यात आली आहे. तर महाराष्ट्र, पंजाब, हरियाणा या राज्यांची जबाबदारी सुप्रिया सुळे यांच्याकडे देण्यात आली आहे.