सध्या एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अमरावतीमध्ये (Amravati) भाजपच्या (BJP) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र यावेळी एक धक्कादायक घटना घडली आहे. कार्यक्रमावेळी मंडप कोसळ्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे तेथील परिसरात खळबळ उडाली आहे.
Accident | समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघात; तीन जणांचा मृत्यू
नरेंद्र मोदी यांच्या सरकारला नऊ वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यामुळे या निमित्ताने अमरावतीच्या नांदगाव पेठ एमआयडीसी येथे भाजपच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी मंडप कोसळला आणि त्यामध्ये भाजपचे खासदार अनिल बोंडे, आमदार नितेश राणे, आमदार प्रविण पोटे हे बडे नेते त्या मंडपाखाली अडकले होते. नंतर त्यांना सर्वांना बाहेर काढण्यात आले.
देवेंद्र फडणवीस आणि माझा घटस्फोट होऊ शकतो? असं का बोलल्या अमृता फडणवीस?
कार्यक्रमादरम्यानच अचानक जोरदार वारा आल्यामुळे संपूर्ण मंडप खाली कोसळला. या घटनेतून नितेश राणे थोडक्यात बचावले आहेत. मात्र मंडप खाली कोसळल्याने कार्यक्रमावेळी मोठी खळबळ उडाली.