Thane News | महाराष्ट्रातील ठाणे शहरात वाहतूक पोलिस कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली. अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपीने आपली कार रस्त्यावर अशा प्रकारे पार्क केली होती की त्यामुळे वाहतूक विस्कळीत होत होती. ते म्हणाले की वाहतूक पोलिसाने आरोपीला त्याचे वाहन हलवण्यास सांगितले, परंतु चालकाने त्याच्यावर हल्ला केला.
Rakhi Sawant । ब्रेकिंग! राखी सावंतचे प्रायव्हेट व्हिडिओ लिक…नेमकं काय घडलं कोर्टात?
घटना कधी घडली?
वर्तक नगर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले की, ही घटना ११ जानेवारी रोजी घडली. “43 वर्षीय सहाय्यक पोलिस निरीक्षक शाळेजवळ वाहतूक नियंत्रित करत होते,” यावेळी आरोपी श्रीनिवास नायडू याने आपली कार अशा प्रकारे पार्क केली होती की त्यामुळे वाहतुकीला अडथळा होत होता.
Nashik News । आत्ताच्या घडीची मोठी बातमी! भुजबळ कुटुंब मोठ्या अडचणीत?
यानंतर वाहतूक पोलिसाने आरोपीला गाडी हलवण्यास सांगितले. वाहतूक पोलिस कर्मचाऱ्याच्या सूचनेमुळे संतप्त होऊन आरोपीने त्याला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्याने पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला केल्याने परिस्थिती आणखी बिघडली. पोलीस कर्मचाऱ्याला खाली ढकलले, कॉलर पकडले आणि धक्काबुक्की केल्याचा प्रकार घडला आहे. सध्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
Uddhav Thackeray । उद्धव ठाकरे आयोध्येला न जाता जाणार ‘या’ ठिकाणी; घेतला सर्वात मोठा निर्णय