Pandharpur News । धक्कादायक! दोन सख्ख्या भावांसह तीन शाळकरी मुलांचा शेततळ्यात बुडून मृत्यू; कुटुंबावर मोठी शोककळा

Pandharpur News

Pandharpur News । शेततळ्यामध्ये लहान मुलांचा बुडून मृत्यू झाल्याच्या अनेक घटना आपण सतत ऐकत असतो. लहान मुलांचा शेततळ्यात घटनाबुडून मृत्यू होण्याच्या घटना या सतत घडत आहेत. सध्या देखील अशीच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पंढरपुरामध्ये दोन संख्या भावांसह तीन शाळकरी मुलांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे त्यांच्या कुटुंबावर मोठी शोकळा पसरली आहे.

Thane News | धक्कादायक! वाहतूक पोलिसाने गाडी हटवण्यास सांगितले, संतप्त चालकाने पोलिसाला केली जबर मारहाण

पंढरपूर तालुक्यातील करकंब गावात काल सायंकाळी ही दुर्दैवी घटना घडल्याची माहिती मिळत आहे. या घटनेने तेथील गावावर देखील मोठी शोककळा पसरली आहे. याबाबत अधिकची माहिती अशी की, तीन लहान मुले खेळता खेळता शेततळ्यामध्ये उतरली त्यानंतर तळ्यातील पाण्याचा अंदाज न आल्याने तीनही मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.

Rakhi Sawant । ब्रेकिंग! राखी सावंतचे प्रायव्हेट व्हिडिओ लिक…नेमकं काय घडलं कोर्टात?

संध्याकाळ झाली तरी अजूनही मुले घरी आलेली नव्हती त्यामुळे त्यांच्या आई-वडिलांनी मुलांचा शोध घेण्यास सुरुवात केली.क यावेळी त्यांच्या घराच्या जवळ असलेल्या शेतकऱ्याच्या शेततळ्यात त्यांचे मृतदेह आढळून आले. यानंतर मुलांना तातडीने रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तीनही मुलांना मृत घोषित केले. एकाच वेळी तिनही मुलांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Nashik News । आत्ताच्या घडीची मोठी बातमी! भुजबळ कुटुंब मोठ्या अडचणीत?

Spread the love