सध्या एक धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) मैनपुरीमध्ये (Mainipur) एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. जी ऐकून तुम्हाला देखील धक्का बसेल. या ठिकाणी एका एका तरुणाने भावाच्या लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी भावासहीत त्याची नवविवाहित पत्नी, मित्र आणि धाकटा भाऊ अशा एकूण 5 नातेवाईकांची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेने सगळीकडे खळबळ उडाली आहे.
जयंत पाटील राष्ट्रवादी का सोडणार? भाजपने सांगितलं मोठं कारण; व्हायरल ट्विटने उडाली खळबळ
कुऱ्हाडीने हल्ला करून तरुणाने सर्वांची हत्या केली आहे. त्यानंतर त्याने स्वतः देखील आत्महत्या केली आहे. नातेवाईकांना मारल्यानंतर तरुणाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण गाव हादरुन गेलं आहे. माहितीनुसार, शनिवारी पहाटे 5 दरम्यान हा संपूर्ण धक्कादायक प्रकार घडला आहे.
सावधान! पुण्यामध्ये अतिवृष्टीचा इशारा; हवामान विभागाची मोठी माहिती
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यामध्ये काही जण जखमी देखील झाले आहेत. सध्या जखमींवर रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत. आता घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे.
शेतकऱ्यांनो पेरणी करत असाल तर थांबा! कृषी विभागाचा अंदाज जाणून घ्या मगच पेरणी करा