Buldhana Accident । समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात, एकाचा मृत्यू तर दोघे गंभीर

Terrible car accident on Samriddhi highway, one dead and two seriously

Buldhana Accident । समृद्धी महामार्गावरील अपघातांची (Samruddhi Mahamarg Accident) मालिका अजूनही थांबलेली नाही. विकासाचा मार्ग अशी समृद्धी महामार्गाची ओळख आहे. हा महामार्ग वाहतुकीसाठी खुला झाल्यापासून सतत या महामार्गावर अपघात (Samruddhi Mahamarg Buldhana Accident News) होतात. या महामार्गावर झालेल्या अपघातांमुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. त्यामुळे अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत. याच महामार्गावर आणखी एक अपघात झाला आहे. (Latest Marathi News)

Viral News । धक्कादायक! तरुणाने पोट दुखू लागल्याने केली तपासणी, पोटात आढळला चाकू.. पाहून डॉक्टरही झाले हैराण

माहितीनुसार, काल रात्रीच्या दरम्यान बुलढाण्याजवळ (Buldhana Accident News) घडली आहे. भरधाव वेगाने एक कार छत्रपती संभाजीनगरहून मेहकरकडे चालली होती. ही कार समृद्धी महामार्गावरील खळेगाव चॅनल नंबर ३०३ जवळ आली त्यावेळी कारचा समोरील टायर फुटला आणि चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे कार रस्त्यावरील दुभाजकाला जाऊन धडकली.

Heavy Rain । क्षणात डोळ्यासमोरून वाहून गेलं सर्वकाही, मुसळधार पाऊस आणि ढगफुटीने जनजीवन विस्कळीत

ही धडक इतकी जोरदार होती की, या अपघातात एकजण जागीच ठार झाला. तर कारमधील इतर प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती पोलिसांनी मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरु केले. जखमींना उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात दाखल केले आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Kirit Somaiya । किरीट सोमय्या व्हिडिओ प्रकरणी लोकशाही वृत्तवाहिनीला मोठा धक्का; पुढील ७२ तास प्रक्षेपण बंद ठेवण्याचे आदेश

Spread the love