Kirit Somaiya । किरीट सोमय्या व्हिडिओ प्रकरणी लोकशाही वृत्तवाहिनीला मोठा धक्का; पुढील ७२ तास प्रक्षेपण बंद ठेवण्याचे आदेश

Kirit Somyya

Kirit Somaiya । मागच्या काही दिवसापूर्वी लोकशाही वृत्तवाहिनीने भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांचा एक व्हिडिओ प्रसिद्ध केला होता. आता याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. सोमय्या यांचा व्हिडिओ प्रसिद्ध केल्याबद्दल लोकशाही वाहिनीवर कारवाई करण्यात आली आहे. याबाबतची माहिती खुद्द लोकशाही वाहिनीचे संपादक कमलेश सुतार यांनी दिली आहे. त्यांनी याबाबत एक पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे.

Government Hospital । शासकीय रूग्णालयात धक्कादायक प्रकार; पेशंटच्या खाटांवर कुत्रे करतायेत आराम

इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत कमलेश सुतार म्हणाले, “किरीट सोमय्या व्हिडिओ प्रकरणी माहिती प्रसारण मंत्रालयाने लोकशाही वृत्तवाहिनीला आज संध्याकाळी सात वाजल्यापासून पुढील ७२ तास प्रक्षेपण बंद करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र सदर आदेशाबाबत आम्ही कायदेशीर सल्ला घेत आहोत असे देखील ते म्हणाले आहेत”.

Ahmednagar Crime । अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर दरोडा प्रकरणात समोर आली धक्कादायक माहिती; नवऱ्याच्या हत्येसाठी बायकोनेच…

त्याचबरोबर, कोरा कागद निळी शाई आम्ही कुणाला भीत नाही असं देखील पोस्टमध्ये ते म्हणाले आहेत. या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच निर्णय देण्यात आला आहे. त्यामुळे आम्ही कायदेशीर सल्ला घेणार आहोत आम्हाला आमची बाजू मांडण्याची संधी द्यायला हवी असे देखील सुतार यांनी म्हटले आहे.

Rohit Pawar । मोठी बातमी! रोहित पवारांचा अजित पवार गटावर गंभीर आरोप; म्हणाले, “सही करा नाहीतर…”

Spread the love