
Supriya Sule । हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेता सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबाराचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. बऱ्याच दिवसांपासून सलमानला लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून जीवे मारण्याच्या धमक्या येत होत्या. त्यामुळे सलमानची सुरक्षाही वाढवण्यात आली होती. कडेकोट सुरक्षा व्यवस्था असतानाही रविवारी सकाळी दोन हल्लेखोर दुचाकीवरून आले आणि त्यांनी सलमानच्या इमारतीत म्हणजेच गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये गोळ्या झाडून लगेच पळ काढला.
Salman Khan । सलमान खानच्या घरावर गोळ्या झाडणारा कोण? धक्कादायक माहिती समोर
या घटनेनंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सत्ताधाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतलाय. जर भररस्त्यामध्ये गोळीबार होत असेल तर अब की बार गोळीबार सरकार, यावर आता शिक्कामोर्तब झाला आहे. असं सुप्रिया सुळे यांनी म्हंटल आहे. राज्यात नक्की काय चाललंय? असा मोठा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला आहे.
हल्लेखोरांचे फोटो समोर
सलमान खानच्या घरावर झालेल्या हल्ल्यानंतर पोलीस ॲक्शन मोडमध्ये आहेत. आधी पोलिसांनी हल्ल्यात वापरलेली दुचाकी जप्त केली आणि त्यानंतर संशयित हल्लेखोरांची छायाचित्रेही समोर आली. दोन्ही आरोपींचे छायाचित्र सीसीटीव्हीत कैद झाले असून, दोघेही रस्त्यावरून चालताना दिसत होते. यावेळी दोघांच्याही खांद्यावर बॅग आणि डोक्यावर टोप्या होत्या. चेहऱ्याची ओळख पटल्यानंतर आता पोलिस या दोघांचा कसून शोध घेत आहेत.
Narendra Modi | गॅस सिलेंडरबाबत नरेंद्र मोदींनी केली सर्वात मोठी घोषणा!