Mumbai News । धक्कादायक बातमी! बॉयफ्रेंडने गळा घोटत संपवलं गर्लफ्रेंडला

Crme Mumbai

Mumbai News । सध्या एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नवी मुंबई या ठिकाणाहून गायब झालेल्या एका 19 वर्षाच्या तरुणीची तिच्याच प्रियकराने गळा घोटत हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेल्या महिन्याभरापासून ही तरुणी बेपत्ता होती. या बेपत्ता असलेल्या तरुणाच्या हत्येचे गुड उलगडण्यास पोलिसांना यश आले आहे. वैष्णवी बाबर असं या तरुणीचे नाव आहे. वैष्णवी हिची हत्या तिच्याच प्रियकराने केली आणि त्यानंतर स्वतःचही जीवन संपवल्याची माहिती समोर आली आहे.

NCP MLA disqualification Case । राष्ट्रवादी आमदार प्रकरणात समोर आली सर्वात मोठी अपडेट!

वैष्णवीच्या प्रियकराने लिहिलेल्या एका चिठ्ठीतील कोड मधून पोलिसांनी तिच्या हत्येचा आणि मृतदेहाचा तपास लावला. त्याचबरोबर पोलिसांना तिची हत्या करणाऱ्या तरुणाच्या मोबाईलमध्ये एक व्हॉइस नोटही सापडली. त्यामध्ये पिल्लू दोन मिनिट जास्त त्रास होणार नाही. मग आपण दुसऱ्या जन्मात प्रवेश करू अशी समजूत काढणारा आवाज ऐकू आला. आरोपी तरुणाने आधी गर्लफ्रेंड वैष्णवीची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर त्यानी स्वतःला रेल्वेखाली झोकून घेत संपवलं. मात्र या प्रेम कहाणीचा हा अंत का झाला? याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

Sharad Pawar । अजित पवारांच्या ‘त्या’ वक्तव्याचा शरद पवारांनी घेतला समाचार

या दोघांचे एकमेकांवर प्रेम होते. मात्र घरच्यांचा लग्नाला विरोध होता. यानंतर 12 डिसेंबरला कॉलेजला जाण्यासाठी वैष्णवी घराबाहेर पडली मात्र ती नंतर घरी आलीच नाही. त्यानंतर कुटुंबीयांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. यानंतर गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी याबाबत तपास सुरू केला. यानंतर वैष्णवीचा तपास लागला मात्र तिचा मृत्यू झाल्याचं समजलं.

Jodhpur Train Accident । पाळीव कुत्र्याने घेतला बहीण-भावाचा जीव, घडलं भयंकर; वाचून बसेल धक्का

Spread the love