Sunetra Pawar । सुनेत्रा पवारांनी सांगितली अजितदादांची ‘ती’ माहिती नसलेली बाजू, दौऱ्यावेळी उलगडलं स्वभावाचं रहस्य

Sunetra Pawar

Sunetra Pawar । महायुतीच्या उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या संभाव्य उमेदवार आहेत. सध्या त्या निवडणुकीच्या तोंडावर मतदारसंघाचा दौरा करत असून या दौऱ्यादरम्यान त्या आपल्या मतदासंघातील लोकसांसोबत संवाद साधत आहेत. यावेळी त्यांनी अजितदादांच्या स्वभावातले काही गुण सांगितले. (Sunetra Pawar vs Supriya Sule)

Topers Ad

Amol Kirtikar । ठाकरेंना मोठा धक्का! लोकसभा उमेदवाराला ईडीचे समन्स

“अजित पवारांच्या स्वभावाची ही बाजू कुणाला माहिती नाही. ते घरी असले की त्यांचा मिश्किल स्वभाव समोर येतो. ते प्रचंड हजरजबाबी असून कुटुंबातील लोक एकत्र असले की ते जोक करतात. त्यामुळे वातावरण हलकं फुलकं होऊन जातं. ‘हमें तुम से प्यार कितना ये हम नहीं जानते’ हे गाणं अजित पवारांना खूप आवडतं”, असंही सुनेत्रा पवारांनी सांगितलं. (Latest marathi news)

Manoj Jarange Patil । निवडणुकांना लागणार वेगळं वळण! जरांगे पाटलांनी घेतली मोठी भूमिका

“सध्या भाव-भावनांचा खेळ सुरु असून मनस्थिती सगळ्यांची वेगळ्या प्रकारची आहे. भावनांचा जरी प्रश्न असला तरी देवही अजून सगळ्या समस्या सोडवू शकला नाही. मागील पंधरा वर्षात तुमचे किती प्रश्न सुटले? मागील पंधरा वर्षात तुमच्या आमदार आणि खासदार यांनी केलेल्या कामांचा लेखा जोखा तुमच्या समोर आहे,” असं म्हणत सुनेत्रा पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर निशाणा साधला.

Lok Sabha Election । आत्ताच्या घडीची मोठी बातमी! ठाकरे गटाची लोकसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर; पाहा कोणत्या नेत्यांना मिळाली संधी?

Spread the love