Solar Eclipse । सोमवारी अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडाच्या अनेक भागांत संपूर्ण सूर्यग्रहणाचे थक्क करणारे दृश्य पाहायला मिळाले. चंद्राने सूर्याला पूर्णपणे झाकण्यास सुरुवात करताच ते पाहण्यासाठी सर्वजण भारावून गेले. पृथ्वीवरील सूर्यग्रहणाचे हे अद्भुत दृश्य लाखो लोकांनी पाहिले आहे, परंतु हे सूर्यग्रहण अवकाशातून कसे दिसते? अमेरिकन स्पेस एजन्सी नासाने त्याचा व्हिडिओ आपल्या अधिकृत यूट्यूब चॅनलवर शेअर केला आहे.
आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरील (ISS) अंतराळवीरांनीही सूर्यग्रहण पाहिल्याचे नासाने सांगितले. यावेळी, फ्लाइट इंजिनियर मॅथ्यू डॉमिनिक आणि जेनेट एप्स स्पेस स्टेशनच्या आतून चंद्राच्या पृष्ठभागावरील सावलीचे फोटो काढत होते आणि व्हिडिओ देखील बनवत होते.
Loksabha Election । सर्वात मोठी बातमी! महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला जाहीर
हे स्पेस स्टेशन कॅनडाच्या 418 किलोमीटर वर घिरट्या घालत होते. न्यूयॉर्क आणि न्यूफाउंडलँड दरम्यान चंद्राची सावलीही एकाच वेळी फिरत होती. या कालावधीतील 90 टक्के घटना स्पेस स्टेशनने टिपल्या.
— NASA (@NASA) April 8, 2024
नासाने शेअर केलेल्या फुटेजमध्ये पृथ्वीवर चंद्राची सावली दिसत आहे. संपूर्ण सूर्यग्रहण दर 11 ते 18 महिन्यांनी जगभरात कुठेतरी होते, परंतु ते सहसा लाखो लोकांना प्रभावित करत नाहीत. अमेरिकेने शेवटचे 2017 मध्ये असे दृश्य पाहिले होते आणि काही वर्षांनी 2045 मध्ये अशी घटना पुन्हा पाहायला मिळेल.