Maharastra Politics । ब्रेकिंग! महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? काँग्रेसचे दोन बडे नेते नॉटरिचेबल

Congress

Maharastra Politics । सांगली लोकसभा मतदारसंघातून (Sangli Lok Sabha Constituency) शिवसेना ठाकरे गट निवडणूक लढणार असल्याची माहिती समोर आली आहे. आज महाविकास आघाडीची पत्रकार परिषद शिवालय कार्यालयात पार पडली आहे. या पत्रकार परिषदेमधून महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. शिवसेना – 21, काँग्रेस – 17, राष्ट्रवादी – 10 असा फॉर्म्युला फिक्स करण्यात आला आहे.

Solar Eclipse । अवकाशातून सूर्यग्रहण कसे दिसले? नासाने शेअर केला व्हिडिओ

सांगली लोकसभा मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाला जागा मिळाल्यामुळे काँग्रेसच्या सांगलीतील स्थानिक नेत्यांमध्ये नाराजी पसरल्याचं पाहायला मिळत आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी राज्यमंत्री विश्वजीत कदम आणि काँग्रेसचे नेते, विशाल पाटील सध्या नॉटरिचेबल असल्याची माहिती समोर आली आहे. हे दोन्ही सांगलीतून उमेदवारीसाठी इच्छूक होते.

Sharad Pawar । शरदचंद्र पवार वैद्यकीय मदत कक्ष ठरतोय रुग्णांसाठी आशेचा किरण; एका महिन्यात इतक्या रुग्णांनी घेतला लाभ

काँग्रेसच्या जिल्हा काँग्रेस कार्यालयासमोरही सध्या देखील शुकशुकाट पाहायला मिळत आहे. त्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. विशाल पाटील यांना उमेदवारी न दिली गेल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी देखील पसरली आहे. सगळ्यांना पुरून उरणार, असं पोस्टर विशाल पाटील समर्थकांनी सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत.

Loksabha Election । सर्वात मोठी बातमी! महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला जाहीर

Spread the love