Solapur Accident । सोलापूरमध्ये भयानक अपघात, भरधाव ट्रकने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या महिलांना चिरडले; 5 जणांचा मृत्यू

Solapur Accident

Solapur Accident । सोलापूर जिल्ह्यात एक भीषण अपघात झाला आहे. यामध्ये पाच महिलांचा मृत्यू झाला, तर दोन महिला गंभीर जखमी झाल्या. सांगोला तालुक्यातील पंढरपूर-कराड रस्त्यावर हा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पाचही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले. दोन्ही गंभीर जखमी महिलांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलीस अपघाताचा तपास करण्यात व्यस्त आहेत.

Pankaja Munde । ‘लोकसभा निवडणूक जिंकली असती तर…’ पराभवानंतर पंकजा मुंडेंचे धक्कादायक विधान

सर्व महिला सांगोला तालुक्यातील काटफळ येथील रहिवासी आहेत. चिकमहुड गावात शेतातील कामे आटोपून घरी जाण्यासाठी महिला पंढरपूर-कराड रोडवर वाहनाची वाट पाहत उभ्या होत्या. त्याचवेळी कोळसा घेऊन जाणारा ट्रक तिथून जात होता. अचानक ट्रक चालकाचा तोल गेला आणि तो महिलांच्या अंगावर धावून गेला. या अपघातात पाच महिलांचा जागीच मृत्यू झाला. तर दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत.

Chhatrapati Sambhajinagar News । मुलगी रिव्हर्स गियरमध्ये गाडी चालवत होती, मित्र व्हिडिओ बनवत होता मात्र घडलं भयानक; कार 300 फूट खोल दरीत पडली

पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवले

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक जमा झाले आणि त्यांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. लोकांनी पोलिसांनाही अपघाताची माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस दाखल झाले आणि दोन्ही गंभीर जखमी महिलांना रुग्णालयात दाखल केले. पाच महिलांचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले.

Mumbai Crime । भयानक! बॉयफ्रेंडने आपल्या एक्स गर्लफ्रेंडची खुलेआम केली हत्या; धक्कादायक व्हिडीओ समोर

Spread the love