Chhatrapati Sambhajinagar News । मुलगी रिव्हर्स गियरमध्ये गाडी चालवत होती, मित्र व्हिडिओ बनवत होता मात्र घडलं भयानक; कार 300 फूट खोल दरीत पडली

Chhatrapati Sambhajinagar News

Chhatrapati Sambhajinagar News । छत्रपती संभाजीनगर येथील खुलताबाद परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एक 23 वर्षांची मुलगी कारमध्ये बसून रील बनवत होती. गाडी रिव्हर्स गिअरवर होती. त्यानंतर घाबरून तिने रिव्हर्स गिअरमध्ये एक्सलेटर दाबला. यामुळे कार खड्ड्यात पडली. यात मुलीचा जागीच मृत्यू झाला.

Maharashtra Cabinet Expansion । ब्रेकिंग! एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची रात्री उशिरा प्रदीर्घ बैठक!

हा अपघात झाला तेव्हा मुलीचा मित्र तिचा व्हिडिओ बनवत होता. गाडी खड्ड्यात पडताच तो मुलीच्या मदतीसाठी धावला. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. कार 300 फूट खोल दरीत कोसळली होती. तरुणाने तत्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मुलीचा मृतदेह आणि गाडी खड्ड्यातून बाहेर काढली. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला.

Mumbai Crime । भयानक! बॉयफ्रेंडने आपल्या एक्स गर्लफ्रेंडची खुलेआम केली हत्या; धक्कादायक व्हिडीओ समोर

पोलिसांनी सांगितले की, सोमवारी दुपारी 23 वर्षीय श्वेता सुरवसे तिचा मित्र शिवराज मुळे याच्यासोबत दत्त धाम परिसरात पोहोचली. इथे ती पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये बसून रील बनवत होती. श्वेता गाडी चालवत होती. शिवराज तिचा व्हिडिओ बनवत होता. गाडी रिव्हर्स गिअरमध्ये होती. त्यानंतर श्वेता घाबरली आणि तिने एक्सलेटर दाबला. गाडी वेगाने मागे जाऊ लागली. कारमध्ये श्वेताशिवाय कोणीही नव्हते. गाडी अशीच मागे जाताना पाहून शिवराज मदतीसाठी गाडीकडे धावला. मात्र दुर्घटना घडली आणि श्वेताचा मृत्यू झाला.

Maharashtra Drought । राजकीय गोंधळाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांना लिहिले पत्र; केली ही मोठी मागणी

Spread the love