धक्कदायक घटना! विद्यार्थ्यांच्या शालेय पोषण आहारात आढळले प्लास्टिकचे तांदूळ

Shocking event! Plastic rice found in school nutrition of students

शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पोषण आहार दिला जातो. हा पोषण आहार सर्व विद्यार्थ्यांना मिळावे यासाठी सरकार नेहमीच प्रयत्न करत असते. अनेक ठिकाणी पोषण आहार पाहिजे तसा विद्यार्थ्यांना मिळत नाही. आता विद्यार्थ्यांच्या पोषण आहारांचे भेसळ करण्याचे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात वाढले आहे. दरम्यान सध्या सोलापूरच्या सांगोला तालुक्यातील घेरडी गावात शालेय पोषण आहाराबाबत एक धक्कदायक माहिती समोर आली आहे.

“धन्य त्यांची हास्यजत्रा…”, राज ठाकरेंच्या मेळाव्यावर राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांची जोरदार टीका

सांगोला तालुक्यातील घेरडी गावात पोषण आहार म्हणून दिल्या जाणाऱ्या तांदळामध्ये चक्क प्लास्टिकचे तांदूळ आढळून आले असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकारामुळे शालेय विद्यार्थ्यांचा आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. घेरडी गावातील महिला सरपंचांनी हा सर्व धक्कादायक प्रकार समोर आणला आहे.

मशिदीवरील भोंग्यांवरून राज ठाकरे यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना गंभीर इशारा!

घेरडी गावातील सरपंच सुरेखा पुकळे यांनी भेसळयुक्त तांदळाचा प्रकार संपूर्ण पुराव्यासह उघडकीस आणला आहे. त्यामुळे या ठिकाणी एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे आता पोषण आहार पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांवर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील सरपंच सुरेखा पुकळे यांनी यावेळी केली आहे.

राज ठाकरे यांनी शिवसेना आणि धनुष्यबाणाच्या वादावर पहिल्यांदाच केलं मोठं वक्तव्य; म्हणाले…

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *