प्रत्येकाला वाटते आपल्याकडे आपली स्वतःची गाडी असावी. त्यामुळे प्रत्येकजण गाडी घेण्यासाठी काही ना काही प्रयत्न करत. काहीजण लोन काढून गाडी घेतात. तर काहीजण आपल्या कामाचे पैसे साठवून देखील गाडी खरेदी करतात. दरम्यान सध्या अशी माहिती समोर आली आहे जी ऐकून तुम्हाला देखील धक्का बसेल.
आसामच्या डारंग जिल्ह्यातील सिपाझर परीसरातील एका तरुणाने स्कुटर खरेदी करण्यासाठी तब्बल सहा वर्ष पैसे साठविले आहे. एवढंच नाहीतर त्याने ९० हजाराची चिल्लर साठवली आहे. या तरुणाचे नाव मोहम्मद सैदुल हक असे आहे. या तरुणाने शेजारच्या शोरूममध्ये 90,000 रूपयांची नाणी देऊन अखेर स्कूटर घेतली आहे. त्यामुळे सध्या त्याची सर्वत्र जोरदार चर्चा सुरु आहे.
मशिदीवरील भोंग्यांवरून राज ठाकरे यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना गंभीर इशारा!
वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या बातमीनूसार हा तरुण गुवाहाटीमध्ये एक छोटे दुकान चालवत असून त्याची अनेक वर्षांपासूनच दुचाकी घेण्याची इच्छा होती. त्यासाठी त्यांनी गल्ल्यात पैसे साठवण्यास सुरूवात केली. आणि अखेर त्याचे हे स्वप्न सत्यात उतरले. सध्या या तरुणाची सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे.
#WATCH | Assam: Md Saidul Hoque, a resident of the Sipajhar area in Darrang district purchased a scooter with a sack full of coins he saved. pic.twitter.com/ePU69SHYZO
— ANI (@ANI) March 22, 2023
धक्कदायक घटना! विद्यार्थ्यांच्या शालेय पोषण आहारात आढळले प्लास्टिकचे तांदूळ