लहान मुलांना खूप लक्ष द्यावे लागते. खेळता खेळता लहान मुलं काय करतील याची गॅरंटी कोणीच नाही देऊ शकत. एखाद्या मोठ्या व्यक्तीने काही कृत्य केलं तर हुबेहूब ते कृत्य करण्याचा लहान मूल प्रयत्न करत असतात. त्यामुळे कधी काही मनाला सुन्न करणाऱ्या घटना घडत असतात. सध्या देखील एक हृदय पिळवून टाकणारी धक्कदायक घटना समोर आली आहे.
नर्मदापुरम जिल्ह्यातील सोहागपूर भागात एका दु:खद घटनेमध्ये 2 महिन्यांच्या मुलीचा बादलीत बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे.
मोठी बातमी ! शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत नवी अपडेट
घटना घडली अशी की, सोहागपूर येथील एका कुटुंबात आईने लहान मुलांचा टेडी पाण्याने धुवून बाजूला सुकायला ठेवला. हे कृत्य दोन चिमुकल्यांनी पाहिलं आणि त्यांनी देखील २ महिन्याचा मुलीला टेडी प्रमाणे अंघोळ घालण्याचा प्रयत्न केला. यावेळी ती दोन महिन्याची चिमुकली बादलीत पडली आणि तिचा बुडून दुर्दवी मृत्यू झाला. यामुळे सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे.
शरद पवारांबद्दल बोलताना गोपीचंद पडळकरांची जीभ घसरली; म्हणाले…