Pune Crime । धक्कादायक! अल्पवयीन मुलांनी केली तरुणाची दगडाने ठेचून हत्या, कारण…

Shocking! A youth was stoned to death by minors because…

Pune Crime । पुणे : पुण्यात (Pune) मागील काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या (Crime) घटनांमध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यावरून गुन्हेगारांना कायद्याचा धाक राहिला नसल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. अशातच आता एक धक्कादायक समोर आली आहे. किरकोळ वादामुळे पाच अल्पवयीन मुलांनी एका तरुणाच्या डोक्यात दगड घालून हत्या केली आहे. (Crime News) त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. (Pune Crime News)

Agri News । करोडपती व्हायचे असेल तर आजच करा ‘या’ जातीच्या शेळ्यांचे पालन, अशी करा सुरुवात

महादेव रघुनाथ मोरे (वय २६ वर्षे, रा. काळेपडळ, हडपसर) असे मृताचे नाव असून याप्रकरणी वानवडी पोलिसांकडून ५ अल्पवयीन मुलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हडपसरमधील रामटेकडी परिसरामध्ये शुक्रवारी मध्यरात्री एक ते तीनच्या सुमारास ही धकाकदायक घटना घडली असल्याची माहिती आहे. (Latest Crime News)

IND VS PAK । पाकिस्तानच्या ‘या’ युवा खेळाडूचं भारताच्या स्टार खेळाडूसोबत गैरवर्तन, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महादेव हा एका खासगी कंपनीमध्ये काम करत होता, तर एक अल्पवयीन मुलगा शाळेत शिकत आहे आणि उरलेली चार मुले काम करून आपले पोट भरतात. काही दिवसांपूर्वी ही मुले महादेवला भेटायला गेली होती. त्यावेळी त्यांच्या किरकोळ कारणावरून वाद झाला. या मुलांनी हाच राग मनात ठेवला होता.

Rain in Maharashtra । आनंदाची बातमी! हवामान विभागाने दिली पावसाबाबत महत्वाची माहिती, कोसळणार मुसळधार पाऊस

ही मुले महादेवला घेऊन रामटेकडी परिसरातील ढेरे कंपनीजवळ डोंगरावर मोकळ्या जागेत दारू पिण्यासाठी गेली होती. त्या ठिकाणी त्यांच्यात पुन्हा वाद झाले. त्या मुलांनी त्याला मारहाण करत दगडाने ठेचून हत्या केली. पोलिसांनी या मुलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Bhiwandi Building collapses । भिवंडीत दुमजली इमारत कोसळून 2 जणांचा दुर्दैवी मृत्यू तर पाच जखमी

Spread the love