
Bhiwandi Building collapses । मुंबई : भिवंडी महानगरपालिका (Bhiwandi Municipal Corporation) परिसरात आजही शेकडो धोकादायक इमारती (Dangerous buildings) आहेत. येथील हजारो नागरिक जीव मुठीत घेऊन जगत आहेत. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या महानगरपालिकेकडून (Municipal Corporation) केवळ नोटिसा बजावून आपले हात झटकल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. महानगरपालिका धोकादायक इमारतींत राहत असणाऱ्या नागरिकांना बाहेर काढण्यात असमर्थ दिसत आहे. (Latest Marathi News)
Accident News । भाजप माजी आमदाराच्या मुलाचा भीषण अपघात! कारचा अक्षरशः चुराडा, आमदार मुलाचा हातच..
अशातच भिवंडीतील दुमजली इमारत कोसळली (Building collapses) आहे. ही घटना शहरातील गौरीपाडा परिसरातील आहे. यात दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे आणि पाच जण जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दल आणि स्थानिक घटनास्थळी दाखल झाले. चार जणांना सुखरूप बाहेर काढले असून आणखी काही जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती आहे. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मध्यरात्रीच्या दरम्यान ही घटना घडल्याने मदतकार्यासाठी अडचण आली. सर्वात धक्कादायक म्हणजे काही दिवसांपूर्वीच भिवंडीमध्ये एक इमारत कोसळली होती. गौरीपाडा परिसरात असणाऱ्या या इमारतीला तब्बल 40 ते 45 वर्ष पूर्ण झालेली आहेत. महानगरपालिकेनं या इमारतीला दोन वेळा नोटीसा बजावल्या आहेत, अशी माहिती मनपा अधिकाऱ्याने दिली आहे.
Jalna News । आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी! शरद पवारांच्या ताफ्यातील गाड्यांची तोडफोड
या इमारतीच्या तळमजल्यावर यंत्रमाग कारखाना होता. धोकादायक इमारतीमध्ये राहत असणाऱ्या नागरिकांना बाहेर काढण्याचं काम महानगरपालिकेचे होतं, परंतु प्रत्यक्षात तसे काही झाले नाही. जर वेळीच महानगरपालिकेने याकडे लक्ष दिले असते तर निष्पाप लोकांना आज आपला जीव गमवावा लागला नसता.
Crime News । धक्कदायक! उपचाराच्या नावाखाली डॉक्टरचे तरुणीसोबत नको ते कृत्य