धक्कादायक! ब्रेक फेल होऊन झालेल्या अपघातात 13 जणांचा मृत्यू

Pakistan Bus Accident

महामार्गावर ब्रेक फेल होऊन झालेल्या अपघातात 13 जणांना आपला जीव गमवावा लागला असून 24 पेक्षा जास्त प्रवासी जखमी झाले आहेत. त्यापैकी अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ही धक्कादायक घटना पाकिस्तानच्या (Pakistan) पंजाब या प्रांतात (Pakistan Bus Accident) शनिवारी रात्री घडली आहे. याबाबत अधिक तपास पाकिस्तान पोलिसांकडून सुरु आहे.

Adipurush । ‘आदिपुरुष’ च्या या 10 मोठ्या चुका ठरत आहेत वादाचं कारण, चित्रपट पाहण्यापूर्वी एकदा पहाच

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात शनिवारी रात्री बसचा ब्रेक फेल (Break failure) होऊन हा भयावह अपघात झाला. इस्लामाबादवरून (Islamabad) ही बस लाहोरला (Lahore) जात होती. परंतु अचानक चालकाचे बसवरील नियंत्रण सुटून बस डिव्हायडरला धडकून उलटली. त्यामुळे या अपघातात एकूण 13 प्रवाशांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये पाच महिला तसेच तीन मुलांचा समावेश आहे. तसेच 24 पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत त्यातील काही प्रवासी हे गंभीर जखमी झाले आहेत त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी! ठाकरे गटाच्या नॉट रिचेबल मनीषा कायंदे शिंदे गटात प्रवेश करणार; उद्धव ठाकरेंना मोठा धक्का

हा अपघात इतका भीषण होता की त्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. या अपघाताची माहिती मिळताच लगेच राष्ट्रीय महामार्ग आणि मोटरवे पोलिस हजर झाले. यातील काही प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढू शकतो, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. तसेच यापूर्वी या मार्गावर असाच एक भीषण अपघात झाला होता. त्यात 14 प्रवाशांचा मृत्यू झाला होता आणि 64 जण जखमी झाले होते.

Gautami Patil । गौतमीच्या कार्यक्रमात पुन्हा राडा; हुल्लडबाजांमुळे दहा मिनिटात कार्यक्रम पडला बंद

हे ही पाहा

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *