
Shirdi News । सध्या एक मोठी बातमी समोर आली आहे. काँग्रेसचे शिर्डी शहराध्यक्ष सचिन चौगुले (Sachin Chowgule) यांच्यावर प्राणघात हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे १० ते १२ जणांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला आहे. राहता तालुक्यातील लोणी गावात हा हल्ला झाल्याची माहिती मिळत आहे. या हल्ल्यामध्ये चौगुले यांच्यासह शिर्डीचे माजी नगरसेवक सुरेश आरने गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी आता रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. (Shirdi Latest Marathi News)
या घटनेमुळे अहमदनगर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात हल्लाखोरांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सध्या या प्रकरणातचा तपास पोलीस यंत्रणा करत आहे. या हल्ल्यानंतर काँग्रेस कार्यकर्ते आणि शिर्डी ग्रामस्थांची रुग्णालयाबाहेर मोठी गर्दी पाहायला मिळाली.
Washing Machines । स्वस्तात खरेदी करा या वॉशिंग मशीन, कुठे मिळत आहे ऑफर? जाणून घ्या
माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा संगमनेर तालुक्यातील आश्वी गावात मंगळवारी कार्यक्रम होता. या कार्यक्रमासाठी चौगुले हे उपस्थित होते. दरम्यान या कार्यक्रमावरून परतताना सायंकाळी लोणी गावाजवळ अज्ञात आरोपींनी त्यांच्या कारवर हल्ला केला व त्यांच्याबरोबर असलेले सुरेश आरने हे दोघेही जखमी झाले आहेत
Pune Crime News । 31 डिसेंबरच्या रात्री पुण्यातील कर्वेनगरमध्ये घडलं भयानक; वाचून हादराल