Pune Crime News । पुण्यामध्ये गुन्हेगारीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. मागच्या काही दिवसापासून पुण्यात कोयता गॅंगने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. अल्पवयीन मुलं गुन्हेगारीकडे आकर्षित होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता पुणे सुरक्षित आहे की नाही?असा मोठा प्रश्न देखील निर्माण होत आहे. सध्या देखील पुण्यातुन 31 डिसेंबरच्या रात्री एक धक्कादायक घटना समोर आली आहे. (Pune News)
Viral Video । लग्नाच्या पहिल्या रात्री कपलचा रोमान्स, स्वतः शेअर केला व्हिडिओ, लोक म्हणाले..
पुण्यातील कर्वेनगर परिसरामध्ये 31 डिसेंबरला दोन मित्र कॉलनीतून जात असताना रस्त्यामध्ये एक टोळके उभा होतो. यावेळी या टोळक्यामधील एका व्यक्तीने दोन मित्रांमधील एका मित्राच्या कानाखाली लावली मित्राच्या कानाखाली मारल्याने दुसऱ्या मित्राने का कानाखाली मारली? असं विचारलं यावेळी झालेल्या बाचाबाची नंतर टोळक्याने त्या दोन मित्रांना बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
31 डिसेंबरच्या रात्री या दोन मित्रांना टोळक्याने बेदम मारहाण केल्याने तेथील परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे कमिन्स कॉलेज असल्यामुळे त्या ठिकाणी राहणारे विद्यार्थीही घाबरले आहेत. कर्वेनगर भागात मुलींचे होस्टेल ही मोठ्या प्रमाणात आहेत. बाहेरून आलेल्या त्यासोबत बाहेर राज्यातील मुलीही तिथे राहता. मात्र अशा घटनांमुळे या मुलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे.