Sharad Pawar । एका मुलाखतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी अनेक मोठे खुलासे केले आहेत. त्याचबरोबर त्यांनी अजित पवार यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले, अजित पवार यांना काय कमी केले? नेहमी सर्व सत्तापदे त्यांना दिली. सुप्रियाला फक्त खासदारकी दिली. मी पुतण्या आणि मुलगी असा भेद कधीच केला नाही. असे शरद पवार यांनी म्हटले आहे.
Pune News । पुण्यात भरदिवसा पोलीस स्टेशन हद्दीत धक्कादायक प्रकार; सोन्याच्या दुकानावर दरोडा
मागच्या काही दिवसापूर्वी मी शरद पवार यांचा मुलगा नाही म्हणून मला संधी मिळाली नाही असा आरोप अजित पवार यांनी केला होता. त्या आरोपाला उत्तर देत शरद पवार म्हणाले मी कधीही पुतण्या आणि मुलगी यांच्यामध्ये भेद केला नाही. त्यामुळे सुप्रिया सुळेला फक्त खासदारकी दिली. आता ती लोकसभेत पक्षाची गटनेता आहे. ती दिल्लीच्या राजकारणामध्ये आहे. मात्र तिला कधीही सत्ता पद दिले नाही पण दुसरीकडे अजित पवार यांना कायमच सत्ता पदे दिली असे शरद पवार म्हणाले.
Navi Mumbai । नववी नापास तरुणाने युट्युबवर पाहून छापल्या नकली नोटा; पोलिसांना समजताच…
त्याचबरोबर पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, “अजित पवार यांना राज्यांमध्ये मंत्री केले. अनेक कॅबिनेट मंत्रीपदे देताना त्यांना सर्व महत्त्वाची खाती देखील दिली. एक दोन नव्हे तर तीन वेळा उपमुख्यमंत्री पद दिले. विधिमंडळातील गटनेते पद देखील अजित पवार यांना दिले हे सर्व दिलं अजून काय हवे होते. असा प्रश्न देखील शरद पवारांनी अजित पवार यांना विचारला.
Manoj Jarange । ब्रेकिंग! मनोज जरांगे यांची अचानक प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचार सुरु