“शरद पवारांचे नाव राजकीय इतिहासात शकुनी मामा म्हणून लिहिले जाणार”, टीका करताना सदाभाऊ खोत यांची जीभ घसरली

Sharad Pawar

“ज्यावेळी महाराष्ट्राचा राजकीय इतिहास लिहिला जाईल त्यावेळी शरद पवार (Sharad Pawar) यांचे नाव शकुनी मामा म्हणून लिहिले जाईल. पाच लाख शेतकऱ्यांच्या आत्महत्येला शरद पवारच जबाबदार आहेत”, असा गंभीर आरोप रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी केली आहे. त्यांच्या या आरोपावरून राजकीय वातावरण चांगलेच तापू शकते. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार खोत यांच्या टीकेला कशाप्रकारे प्रत्युत्तर देणार हे पाहण महत्त्वाचे ठरणार आहे. (Latest Marathi News)

5 स्टार हॉटेलसमोर विद्या बालनने मागितले होते भीक, स्वतः च सांगितला ‘तो’ भयानक किस्सा

पुढे ते म्हणाले की, ” समजा 25 किलोमीटर परिसरात एका पेक्षा जास्त कारखाने असल्यास त्याचा ऊसाच्या कांडीवरून भाव ठरवला जातो. प्रत्येक पक्षात यांची लोकं असून या सर्वांचा ब्रेन कोण आहे तुम्हाला माहिती आहे का? बारामतीकर… आदरणीय पवार साहेब. राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष नसून एक टोळी आहे. अलीबाबा आणि चाळीस चोर सहकारी कारखाना बंद पडला की घेऊन बंद पाडतात. त्यांचे खासगीकरण करून हेच चालवतात.”

विश्वास बसेना! डासांमुळे ‘या’ गावातील मुलांची लग्न होत नाही, कारण जाणून तुम्हीही हादराल

“शरद पवार यांच्या ताब्यात सहकारीमधून खासगीकरण करण्यात आलेले एकूण 50 कारखाने आहेत. स्वर्गात जाताना खालूनवर नेता आलं असते तर या जातीने खाली काहीच ठेवले नसते. राज्यपाल राजवट उठावी यासाठी त्यांनीच अजित पवार (Ajit Pawar) यांना पाठवले होते,” असा दावाही सदाभाऊ खोत यांनी केला आहे.

Joe Lindner । मोठी बातमी! प्रसिद्ध बॉडी बिल्डरचं वयाच्या 30 व्या वर्षी निधन

हे ही पहा

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *