Sharad Pawar । राजकारणातील मोठी बातमी समोर; शरद पवारांच्या गौप्यस्फोटाने उडाली खळबळ

Sharad Pawar

Sharad Pawar । राज्याच्या राजकारणात मागच्या काही दिवसापासून अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. यामुळे राज्याच्या राजकारणात कधी काय होईल याचा अंदाज लावणे शक्य नाही. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. यामुळे सगळीकडे मोठी खळबळ उडाली आहे. काँग्रेस आणि आमच्या पक्षामध्ये फरक नाही. वैचारिकदृष्ट्या आम्हीसुद्धा गांधी, नेहरु यांच्या विचाराचे आहोत. यामुळे अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात, असा दावा शरद पवार यांनी केला आहे.

Baramati Lok Sabha Elections । अजित पवार यांना मोठा धक्का! बारामतीत मतदानाच्या दिवशीच बड्या नेत्यावर गुन्हा दाखल

एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार यांनी हा गौप्यस्फोट केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. त्याचबरोबर उद्धव ठाकरे आपल्याच विचारधारेचे आहेत. ते समविचार आहे, असा दावा देखील यावेळी शरद पवार यांनी केला आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.

Madhya pradesh News । ब्रेकिंग! मतदानानंतर ईव्हीएम घेऊन जाणाऱ्या बसला भीषण आग; सर्व जाळून खाक

शरद पवार यांनी एका वृत्तपत्राला मुलाखत दिली आहे यामध्ये त्यांनी काही धक्कादायक दावे केले आहेत. 2024 च्या लोकसभा निवडणुकीनंतर देशातील प्रादेशिक पक्षांच्या भवितव्याबाबतही मोठी विधाने त्यांनी केली आहेत. सध्या त्यांची विधाने चर्चेत आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील, असा दावा त्यांनी केला आहे.

EVM Fire News । माढा लोकसभा निवडणुकीदरम्यान सर्वात मोठी बातमी, व्यक्तीने EVM मशीनच पेटवली

Spread the love