Lok Sabha Election 2024 । महाराष्ट्रातील 11 जागांवर मतदानाची ताजी आकडेवारी, जाणून घ्या बारामतीची स्थिती?

Loksabha Election 2024

Lok Sabha Election 2024 । महाराष्ट्रातील लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यातील 11 जागांपैकी बारामतीच्या जागेवर सर्वांचे लक्ष लागले आहे. दुपारी 3 वाजेपर्यंत हातकणंगलेमध्ये 49.94 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. इतर जागांचे बोलायचे झाले तर लातूरमध्ये ४८.४४ टक्के, सांगलीत ४१.३० टक्के, बारामतीमध्ये ३४.९६ टक्के आणि कोल्हापुरात ५१.५१ टक्के मतदान झाले आहे. (Maharashta Lok Sabha Election 2024)

Baramati Lok Sabha Elections । अजित पवार यांना मोठा धक्का! बारामतीत मतदानाच्या दिवशीच बड्या नेत्यावर गुन्हा दाखल

त्याचवेळी दुपारी 3 वाजेपर्यंत माढा येथे 39.11 टक्के, उस्मानाबादमध्ये 40.92, रायगडमध्ये 41.43, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये 44.73, सातारा येथे 43.83 आणि सोलापूरमध्ये 39.54 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी कुटुंबासह रत्नागिरीत मतदान केले. भाजपने रत्नागिरीतून नारायण राणे यांना तिकीट दिले आहे.

Ajit Pawar । मिश्या काढण्यासंदर्भात अजित पवार यांचे मोठे वक्तव्य; श्रीनिवास पवारांना लगावला टोला

काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्नीसह कराडमध्ये मतदान केले. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा यांनी बारामतीत मतदान केले. सुनेत्रा बारामतीतून राष्ट्रवादीच्या उमेदवार आहेत. राष्ट्रवादीचे नेते शरदचंद्र पवार यांनी देखील बारामतीत जाऊन मतदानाचा हक्क बजावला.

Loksabha Election । धक्कादायक! महाराष्ट्रात आजचे मतदान हाणामाऱ्यांनी गाजले; ३ ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा

Spread the love