
Sharad Pawar । राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी उद्धव ठाकरे गटात अस्वस्थता असल्याचे आणि लवकरच त्यात फूट पडणार असल्याचा दावा केला आहे. त्याचवेळी शरद पवार यांनीही यावर प्रतिक्रिया दिली, ज्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
Eknath Shinde । सर्वात मोठी बातमी! शिवसेनेचा मोठा नेता एकनाथ शिंदेंवर नाराज?
उदय सामंत यांनी विधानसभेतील दारूण पराभवावरून उद्धव ठाकरे गटात अस्वस्थता निर्माण झाल्याचा दावा करत, चार आमदार आणि तीन खासदार लवकरच शिंदे गटात सहभागी होणार असल्याचे म्हटले आहे. रत्नागिरीत त्यांचा पक्ष प्रवेश ट्रेलर दाखवला जाईल असा इशाराही त्यांनी दिला.
Tomato Rate । शेतकऱ्यांसमोर मोठी चिंता; टोमॅटोला मिळतोय कवडीमोल भाव
शरद पवार यांनी या दाव्याला उत्तर देताना उदय सामंत यांना टोला मारला. “दावोसला गुंतवणुकीसाठी गेले होते की पक्ष फोडण्यासाठी?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. यामुळे राजकारणात एक नवा वाद उफाळला आहे. शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या मेळाव्यांमध्ये उद्धव ठाकरे गटाला अधिक गर्दी झाली, असे पवार म्हणाले.
शरद पवार यांनी निष्ठावंत कार्यकर्ते शिंदे गटात जाण्याची शक्यता नाकारली आहे. महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे स्वतंत्र लढण्याचा विचार करत असतील, तर महाविकास आघाडीत त्यावर चर्चा होईल, असे त्यांनी सांगितले.