
Sharad Pawar । पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha election) शरद पवारांनी दंड थोपटले आहेत. लेक खासदार सुप्रिया सुळे यांच्यासाठी शरद पवार मैदानात उतरले आहेत. शरद पवार गटाने नवीन चिन्ह आणि पक्षाचे नाव बदलल्याने त्यांच्यापुढे गावोगावी प्रचार करणे यंदा थोडे मुश्किल असणार आहे. अशातच आता लेकीच्या विजयासाठी शरद पवारांनी घेतली २० वर्षांचे वैर विसरुन अनंतराव थोपटेंची (Anantrao Thopate) भेट घेतली आहे. (Latest marathi news)
या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. (Sharad Pawar met Anantrao Thopate) यंदाची बारामतीची लढत शरद पवार गटासाठी अटीतटीची असणार आहे, याची जाणीव शरद पवारांना झाल्याची चर्चा सुरु आहे. शरद पवार यांनी हरिश्चंद्री येथे सभा घेतली. शरद पवारांनी सभेपूर्वी माळवाडी येथे माजी मंत्री अनंतराव थोपटे यांची भेट घेतली. शरद पवार आणि थोपटे अनेक वर्षांपासून राजकीय विरोधक आहेत.
Bjp । भाजपला सर्वात मोठा धक्का! महिला नेता ठोकणार पक्षाला रामराम
१९९९ मध्ये शरद पवार यांनी भोरमध्ये अनंतराव थोपटे यांचा पराभव करत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार काशीनाथराव खुटवड यांना निवडून आणले होते. त्याचवेळी थोपटे हे कांग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते होते. ते मुख्यमंत्रीपदाचे दावेदार समजले जायचे पण पराभव झाल्याने त्यांची संधी हुकली. २००४ मध्ये पुन्हा थोपटे निवडून आले, पण ते सत्तेपासून कायम दूर राहिले.
Lok Sabha Elections । बिग ब्रेकिंग! अजितदादांची अमित शहांकडे लोकसभेसाठी ‘इतक्या’ जागांची मागणी