Sharad Pawar । शरद पवार गटाला मोठा धक्का! पश्चिम महाराष्ट्रात अजित पवारांचीच ‘दादागिरी’

sharad pawar

Sharad Pawar । अनेक जिल्ह्यांमध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागल्या होत्या. काल या निवडणुकांचा निकाल लागला असून अजित पवारांनी पश्चिम महाराष्ट्रात आपला दबदबा दाखवून दिला आहे. बारामती तालुक्याचा जर आपण विचार केला तर बारामती तालुक्यामध्ये एकूण 32 ग्रामपंचायतीचा निकाल लागला आहे. ज्यामध्ये अजित पवार (Ajit Pawar) गटाने निर्विवाद ३० ग्रामपंचायतींवर झेंडा फडकवला. तर शरद पवार गटाने बारामतीच्या 32 ग्रामपंचायतीमध्ये पॅनलच उभं केलं नव्हतं. महत्त्वाची बाब म्हणजे पहिल्यांदाच बारामती मध्ये भाजपने दोन ग्रामपंचायती जिंकल्या. (Latest Marathi News)

Baramati Gram Panchayat Election । बारामतीचा ‘दादा’ कोण? धक्कादायक निकाल आला हाती; शेवटी…

पूर्ण पश्चिम महाराष्ट्रात ग्रामपंचायत निवडणुकांचा (Gram Panchayat Elections) आपण जर विचार केला तर अजित दादांचा गट काका पवारांच्या गटापेक्षा वरचढ असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात अजित पवारांची जास्त ताकद असल्याचे देखील बोलले जात आहे. राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर ही पहिलीच निवडणूक झाली आहे. यानंतर महापालिकेच्या निवडणुका होण्याची चिन्ह दिसत नाही. त्यामुळे आता थेट लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे आता या निवडणुकांमध्ये नेमकं कोण बाजी मारणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Accident News । लग्नाच्या वरातीवर काळाचा घाला! नवरदेवासह चारजण जागीच ठार

कोणत्या जिल्ह्यात कोणी बाजी मारली?

पुणे जिल्ह्याचा विचार केला तर पुणे जिल्ह्यात २३८ ग्रामपंचायत पैकी अजित पवार गटाने 109 तर शरद पवार गटाने 22 ग्रामपंचायती जिंकल्या आहेत. त्याचबरोबर कोल्हापूरमध्ये 91 ग्रामपंचायतपैकी अजित पवार गटाने 23 ग्रामपंचायती तर शरद पवार गटाचे खाते देखील उघडले नाही. तसेच सोलापूर या ठिकाणी 111 ग्रामपंचायत पैकी अजित पवार गटाने 15 ग्रामपंचायत जिंकल्या तर शरद पवार गटाने 2 ग्रामपंचायत जिंकल्या. सातारा जिल्ह्यात 140 ग्रामपंचायत पैकी अजित पवार गटाने 36 तर शरद पवार गटाने 24 ग्रामपंचायत जिंकल्या आहेत. त्याचबरोबर सांगली या ठिकाणी 97 ग्रामपंचायतींपैकी अजित पवार गटाने 2 तर शरद पवार गटाने 22 ग्रामपंचायती जिंकल्या आहेत.

Mumbai Crime News । वृद्ध महिलेच्या घरातून सुरू होते सेक्स रॅकेट; पोलिसांनी केली धडक कारवाई अन् घटना वाचून बसेल धक्का

Spread the love