Karjat Accident News । भीषण अपघात, भरधाव कार पुलावरून रेल्वे ट्रॅकवर कोसळली; ३ जणांचा मृत्यू

Karjat Accident News

Karjat Accident News । अपघाताच्या घटना काही थांबायचं नाव घेत नाहीत दररोज कुठे ना कुठे अपघात होतच आहेत. जसे रस्ते चांगले होत चाललेत तसेच अपघाताचे प्रमाण देखील वाढत चालल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. रस्ते चांगले असल्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटून अपघात झाल्याचे आपल्याला ऐकायला मिळते. त्याचबरोबर वन्य प्राणी आडवे येऊन, वाहनाचे टायर फुटून देखील अपघात होतच असतात. सध्या देखील अपघाताची एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

Sharad Pawar । शरद पवार गटाला मोठा धक्का! पश्चिम महाराष्ट्रात अजित पवारांचीच ‘दादागिरी’

कर्जत नेरळ महामार्गवर भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. कर्जतहून नेरळच्या दिशेने निघालेली कार किरवली पुलावरून थेट रेल्वे ट्रॅकवर कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्याचबरोबर कार कोसळताच येणाऱ्या मालगाडीने कारला जोरदार धडक दिली आणि भीषण अपघात झाला. (Karjat Accident News)

Baramati Gram Panchayat Election । बारामतीचा ‘दादा’ कोण? धक्कादायक निकाल आला हाती; शेवटी…

हा अपघात एवढा भीषण होता की, या अपघातामध्ये तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. ही घटना मंगळवारी पहाटेच्या सुमारास घडली आहे. या घटनेमुळे तेथील परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Accident News । लग्नाच्या वरातीवर काळाचा घाला! नवरदेवासह चारजण जागीच ठार

Spread the love