Shah Rukh Khan। अपघातनंतर पहिल्यांदाच मुंबई एअरपोर्टवर स्पॉट झाला शाहरुख, पहा व्हिडिओ

shahtukh khan

Shah Rukh Khan । बॉलिवूडचा किंग खान अर्थातच शाहरुख खान (Shah Rukh Khan) हा लॉस एंजेलिसमध्ये (Los Angeles) शूटिंग दरम्यान जखमी झाला होता. त्यामुळे त्याच्यावर एक शस्त्रक्रियाही करावी लागली होती. ही बातमी त्याच्या चाहत्यांना समजताच त्यांना मोठा धक्का बसला आहे. परंतु आता शाहरुख खानची तब्येत चांगली असून तो पत्नी गौरी खान (Gauri Khan) आणि मुलगा अबरामसोबत आज मुंबई विमानतळावर दिसला होता. (Latest Marathi News)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेमका कुणाचा? आमदारांची सत्वपरिक्षा, आजच्या बैठकीकडे सगळ्यांचे लक्ष

तो आज सकाळी एमिरेट्सचे विमानातून दुबईमार्गे मुंबईला आला आहे. त्याचा आता एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. ज्यामध्ये तो तंदुरुस्त दिसत आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहेत. पापाराझींनी शाहरुखला विमानतळावर पाहताच त्याला लगेचच घेरून त्याच्या तब्येतीची विचारपूस केली. परंतु त्यावर शाहरुख काहीच बोलला नाही. (Shah Rukh Khan Accident)

घृणास्पद! आदिवासी तरुणाच्या चेहऱ्यावर भाजप नेत्याने केली लघुशंका, व्हिडीओ व्हायरल

दरम्यान, शाहरुख लॉस एंजेलिस येथे त्याच्या एका आगामी चित्रपटाचे शूटिंग करत असताना त्याच्या चेहऱ्याला आणि नाकाला दुखापत झाली होती. रक्तस्त्राव थांबत नसल्याने शस्त्रक्रिया करावी लागली आहे. त्यामुळे तो काही दिवस आराम करण्यासाठी मुंबईत परतला आहे.

आम्ही शरद पवार यांच्यासोबत, इंदापूरमधून दुसरी भूमिका जाहीर

हे ही पहा

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *