राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेमका कुणाचा? आमदारांची सत्वपरिक्षा, आजच्या बैठकीकडे सगळ्यांचे लक्ष

NCP

वर्षभरापूर्वी विरोधी बाकावर असलेले अजित पवार (Ajit Pawar) हे आज सत्तेत सहभागी झाले आहेत. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये (NCP) बंड करून उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तसेच पक्षावर आणि पक्षाच्या चिन्हावर दावा केला आहे. त्यांच्या बंडामुळे पक्षामध्ये फूट पडली आहे. त्यामुळे पक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) अशा दोन गटांमध्ये विभागला गेला आहे. या दोन्ही गटांपैकी कोणाला साथ द्यावी, असा गोंधळ कार्यकर्त्यांमध्ये तयार झाला आहे. (Latest Marathi News)

घृणास्पद! आदिवासी तरुणाच्या चेहऱ्यावर भाजप नेत्याने केली लघुशंका, व्हिडीओ व्हायरल

आपल्याकडेच बहुमत जास्त आहे असा दावा या दोन्ही गटांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. परंतु त्यांनी आमदार आणि खासदारांचा आकडा निश्चित केला नाही. याच पार्श्वभूमीवर आज शरद पवार यांच्या उपस्थितीत वाय.बी. चव्हाण सेंटरमध्ये दुपारी 1 वाजता आमदार आणि खासदारांची बैठक पार पडणार आहे. तर अजित पवार यांचा भुजबळ सीटीमध्ये आमदार आणि खासदारांचा मेळावा पार पडणार आहे. दरम्यान, या दोन्ही गटाकडे किती आमदार आणि खासदार आहेत, हे आज स्पष्ट होईल.

आम्ही शरद पवार यांच्यासोबत, इंदापूरमधून दुसरी भूमिका जाहीर

दरम्यान,अजित पवार गटाकडून प्रतोद अनिल पाटील (Anil Patil) यांनी व्हीप जारी केला आहे. तर शरद पवार गटाकडून प्रतोद जितेंद्र आव्हाड (Jitendra Awad) यांनी व्हीप जारी केला आहे. एक पक्ष आणि दोन व्हीप यामुळे आमदारांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यामुळे आज राजकीय वातावरण पुन्हा एकदा ढवळू शकते.

LPG Cylinder Price । एलपीजी सिलिंडरचे नवीन दर जाहीर! तुमच्या खिशाला झळ बसणार का? पहा

हे ही पहा

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *