समृद्धी महामार्गावर बसचा भीषण अपघात! 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू; तर अनेकजण जखमी

Serious bus accident on Samriddhi highway! 25 passengers died in the crash; So many injured

सध्या एक भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. बुलढाण्यात नागपूरहून पुण्याला जाणाऱ्या खासगी बसचा समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. (Terrible accident of private bus on Samriddhi highway) ही बस पलटी झाली. आणि त्यानंतर या बसला आग लागली. आणि हा भीषण अपघात झाला. समृद्धी महामार्गावर अपघाताचे सत्र सुरूच आहे. या अपघातामुळे सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत फेटा बांधणार नाही – पंंकजा मुंडे

हा अपघात एवढा भीषण होता की बस (Bus) पलटी होऊन पेटली आणि आगीने पेट घेतला त्यामुळे या बसमधून प्रवास करणाऱ्या 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर या अपघातात अनेकजण जखमी देखील झाले आहेत.

अखेर मुहूर्त ठरला! ‘या’ दिवशी पार पडणार नवीन मंत्र्यांचा शपथविधी

आगीमुळे बस जळून पूर्णपणे खाक झाली आहे. या घटनेची माहिती मिळताच तेथील स्थानिक लोकांनी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि बचावकार्य सुरु केले. या अपघातामध्ये जखमी झालेल्या लोकांना तातडीने रुग्नालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत.

Sushant Singh Rajput Case । सुशांतच्या मृत्यूबाबत नवीन खुलासा! अमेरिकेत लपले मृत्यूचे पुरावे?

या बसमधून 30 प्रवाशी प्रवास करत होते. त्यापैकी 25 प्रवाशांचा जागीच होरपळून मृत्यू झाला. तर चालकासह चारजण या अपघातातून वाचले आहेत. सध्या मृतांची ओळख पटविण्याचे काम चालू आहे.

कौतुकाचा वर्षाव होताना लेशपाल जवळगे याचे ‘ते’ वक्तव्य चर्चेत; म्हणाला,’ मी शेतकरी कुटुंबातला…’

हे ही पाहा

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *