मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत फेटा बांधणार नाही – पंंकजा मुंडे

Pankaja Munde will not build feta until Maratha community gets reservation

मागच्या काही दिवसापासून मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेचा विषय ठरत आहे. अनेक नेत्यांनी प्रयत्न करून देखील अजूनही मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही. दरम्यान आता भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन एक मोठं वक्तव्य केलं आहे. (Latest Marathi News)

अखेर मुहूर्त ठरला! ‘या’ दिवशी पार पडणार नवीन मंत्र्यांचा शपथविधी

पंकजा मुंडे म्हणाल्या, “मराठा समाजाला जोपर्यंत आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत आपण फेटा बांधणार नाही, असं त्या म्हणाल्या आहेत. सध्या त्यांच्या वक्तव्याची सगळीकडे जोरदार चर्चा होताना दिसत आहे. त्यांच्या या वक्तव्यावर अनेकांनी प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. पंकजा मुंडे बीडमध्ये आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या.

Sushant Singh Rajput Case । सुशांतच्या मृत्यूबाबत नवीन खुलासा! अमेरिकेत लपले मृत्यूचे पुरावे?

बीडच्या एका कार्यक्रमात बोलताना पंकजा मुंडे यांनी हे मोठे वक्तव्य केले आहे. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. फक्त मराठा आरक्षणावरच नाही तर या कार्यक्रमात बोलताना पंकजा मुंडे यांनी आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर देखील सूचक वक्तव्य केलं आहे. (Lok Sabha and Assembly Elections)

कौतुकाचा वर्षाव होताना लेशपाल जवळगे याचे ‘ते’ वक्तव्य चर्चेत; म्हणाला,’ मी शेतकरी कुटुंबातला…’

पंकजा मुंडे यांनी मराठा आरक्षणाबद्दल केलेल्या वक्तव्यावर राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “आरक्षणाच्या नावाखाली सरकार आपली जबाबदारी झटकत नाहीय. मराठा समाजाच्या मुलांच्या शिक्षणाची योग्य सोय सरकार करतंय, त्यामुळे आरक्षण मिळायलाच पाहिजे, त्यासाठी आपण प्रयत्न करतोय. पण त्यासाठी भावनिक मुद्दा करुन काही साध्य होणार नाही”, असं राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले आहेत.

सर्वात मोठी बातमी! मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटासाठी दोन केंद्रीय मंत्र्यांना वगळलं जाणार

हे ही पाहा –

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *